लॉनमधील गवत कापत होते वडील, अचानक एक खिळा उडून मुलाच्या डोळ्यात घुसला अन्
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 01:14 PM2020-07-23T13:14:45+5:302020-07-23T13:56:37+5:30
अर्थातच हे फारच भयंकर घटना आहे. कारण मुलाच्या डोळ्याचा फोटो पाहून मुलाला होणारा त्रास आणि वडिलांना होणारं दु:खं समजू शकतं.
थायलॅंडमधून एक अशी घटना समोर आली आहे जी वाचून अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. इथे एक वडील लॉनमध्ये मशीनने गवत कापत होते. बाजूलाच त्याचा मुलगा होता. अचानक गवतातील एक खिळा उडून आणि मुलाच्या डोळ्यात घुसला. अर्थातच हे फारच भयंकर घटना आहे. कारण मुलाच्या डोळ्याचा फोटो पाहून मुलाला होणारा त्रास आणि वडिलांना होणारं दु:खं समजू शकतं.
मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना थायलॅंडच्या Khon Kaen शहरातील आहे. इथे सोमवारी एक व्यक्ती Shoulder-Slung Petrol Mower मशीनच्या मदतीने लॉनवरील गवत कापत होता. याच गवतात एक लांब खिळा होता. जेव्हा मशीनचं ब्लेड त्याला लागलं तेव्हा खिळा उडाला आणि बंदुकीच्या गोळीप्रमाणे मुलाच्या डोळ्यात घुसला.
वडिलांनी लगेच वेदनेने विव्हळत असलेल्या मुलाला उचलून हॉस्पिटलमध्ये नेले. सुदैवाने मुलाच्या डोळ्याची दृष्टी गेली नाही. मेडिकल स्टाफने मुलाचे काही फोटो पाठवले आहेत, जे तुम्हाला विचलित करू शकतात. त्यांनी एक्स-रे ही काढला. ज्यात स्पष्ट दिसत आहे की, खिळा मुलाच्या कवटीपर्यंत पोहोचलाय.
डॉक्टरांनी सुरक्षितपणे मुलाच्या डोळ्यातून खिळा काढलाय. मुलगा सध्या हॉस्पिटलमध्ये भरती आहे. डॉक्टरांनी सांगितले की, तो लवकर बरा होईल आणि लवकरच आधीसारखा बघूही शकेल. अशाप्रकारच्या घटनांमधून हेच शिकायला मिळतं की, आपण आपल्या लहान मुलांची कशी काळजी घेतली पाहिजे. त्यांना कसं जपलं पाहिजे. नाही तर एका छोटी चूक त्यांना महागात पडू शकते.
फक्त सरनेममुळे महिलेचा नोकरीचा अर्ज पुन्हा पुन्हा रिजेक्ट, लोकही उडवतात खिल्ली!
अर्धवट शिजवलेला मासा खाणं महागात पडलं; चिनी व्यक्तीनं निम्मं यकृत गमावलं