जन्मल्यानंतर अर्ध्या तासात व्हेलच्या पिलानं सोडले प्राण; १७ दिवस 'त्याला' घेऊन फिरत होती आई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 07:25 PM2020-07-30T19:25:32+5:302020-07-30T19:36:04+5:30
पल्या पिल्लाच्या मृत्यूनंतर जवळपास १७ दिवसांपर्यंत मेलेलं शरीर घेऊन समुद्रात फिरत होता. जेणेकरून आपलं पिल्लू बडू नये असं या आईला वाटत होतं.
सोशल मीडियावर सध्या एका व्हेलची गोष्ट तुफान व्हायरल होत आहे. ही घटना वाचून तुम्हीही भावूक व्हाल. दक्षिण रेजिडेंट किलर व्हेंलपैकी तहलक्वा हा मासा आपल्या पिल्लाच्या मृत्यूनंतर जवळपास १७ दिवसांपर्यंत मेलेलं शरीर घेऊन समुद्रात फिरत होता. जेणेकरून आपलं पिल्लू बडू नये असं या आईला वाटत होतं. सोशल मीडियावर हा फोटो खूप व्हायरल झाला आहे. फोटो पाहून नेटकरी भावूक झाले आहेत. संशोधकांच्या भाषेत तहलक्वा J35 नावाने या माश्याला ओळखलं जातं.
सिएटल टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार वॉश्गिंटनच्या तज्ज्ञांनी हे शोधले की दक्षिणी रेजीडेंट किलर व्हेलचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो ड्रोनच्या साहाय्याने कॅप्चर करण्यात आला आहे. एका मोठ्या रिसर्चनंतर मिळालेल्या माहितीनुसार जवळपास १८ महिन्यांचा कालावधी व्हेलला पिल्लू होण्यासाठी लागतो. एसआर 3 नावाच्या समुद्री जीवन प्रतिक्रिया पुनर्वसन आणि अनुसंधान समूहाने या गर्भवती तहलक्वा आणि अन्य गर्भवती व्हेलचे फोटो ड्रोनच्या साहाय्याने कॅप्चर केले आहे. दक्षिणी रेजिडेंटला जीवंत राहण्यासाठी संषर्घ करावा लागत आहे.
वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या माहितीनुसार व्हेलने आपल्या पिल्लाला २५ जुलै २०१८ ला जन्म दिला. तसंच २०१५ मध्ये या व्हेलने आपल्या पहिल्या पिल्लास जन्म दिला होता. पण जन्मल्यानंतर अर्ध्या तासातच हे पिल्लू मेले. या व्हेल माश्याने आपल्या मेलेल्या पिल्लासोबत जे केलं ते वाचून तुमचे डोळे पाणावतील. जवळपास १७ दिवसांपर्यंत आपलं मेलेलं पिल्लू पाण्यात बूडु नये यासाठी मृत पिल्लाला घेऊन आई १७ पाण्यात पोहत फिरत होती. तज्ज्ञांना आशा आहे की तहलक्वाच्या या पिल्लाचा जन्म यशस्वी होईल.
कोरोनाच्या माहमारीविरुद्ध लढण्यासाठी WHO चं भारताला आवाहन, तज्ज्ञ म्हणाले की.....