किम जोंगने आजही त्याचे वडील आणि आजोबांचा मृतदेह ठेवला आहे सुरक्षित, येणारा खर्च वाचून व्हाल अवाक्....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 02:15 PM2022-12-05T14:15:39+5:302022-12-05T14:31:40+5:30

Kim Jong Un : तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, किम जोंग याने त्याचे आजोबा आणि वडिलांचे मृतदेह अजूनही सुरक्षित ठेवले आहेत. 

Kim Jong Un father and grandfather dead bodies still safe in this palace | किम जोंगने आजही त्याचे वडील आणि आजोबांचा मृतदेह ठेवला आहे सुरक्षित, येणारा खर्च वाचून व्हाल अवाक्....

किम जोंगने आजही त्याचे वडील आणि आजोबांचा मृतदेह ठेवला आहे सुरक्षित, येणारा खर्च वाचून व्हाल अवाक्....

Next

Kim Jong Un : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. नुकताच त्याने देशातील लोकांना नावे बदलण्याचा आदेश जारी केला. त्यामुळे तो चर्चेत आहे. त्याच्यासंबंधी वेगवेगळ्या हैराण करणाऱ्या घटनाही समोर येत असतात. आज अशीच एक त्याच्याविषयीची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, किम जोंग याने त्याचे आजोबा आणि वडिलांचे मृतदेह अजूनही सुरक्षित ठेवले आहेत. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, किम जोंग याचे वडील किम जोंग इल आणि आजोबा किम जोंग इल सुंग यांचे पार्थिवं कुमसुसन मेमोरिअल पॅलेसमध्ये सांभाळून ठेवण्यात आले आहेत. हा पॅलेस या दोघांच्या पार्थिवांसाठी खासकरून तयार करण्यात आला होता. इथे असा रिवाज आहे की, कुमसुसन पॅलेसच्या जवळ जाणाऱ्या लोकांना या पार्थिवांसमोर तीनदा वाकून नमन करावं लागतं. 

कुमसुसन मेमोरिअल पॅलेसच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र जवान तैनात असतात. तर या पॅलेसमध्ये ठेवण्यात आलेल्या किम जोंग याच्या वडिलांच्या आणि आजोबांच्या पार्थिवांची देखरेख रशियातील लेनिन लॅब करते. लेनिन लॅबच्या वैज्ञानिकांच्या टीमने या नेत्यांच्या पार्थिवांना संरक्षित केलं आहे. याच लॅबच्या वैज्ञानिकांनी १९२४ मध्ये रशियाचे नेते व्लादिमीर लेनिन यांच्या पार्थिवाची एम्बामिंग केली होती.

एम्बामिंगच्या माध्यमातून मृत शरीरांना लवचिक आणि त्वचा तरूण ठेवता येते. पार्थिवांची एम्बामिंग करण्यात अनेक महिन्यांचा कालावधी लागतो. याच प्रक्रियेच्या माध्यमातून किम जोंग यांच्या वडिलांचे आणि आजोबांचे मृत शरीर सुरक्षित केले आहेत.

किम जोंग याच्या वडिलांच्या आणि आजोबांच्या शरीराची एम्बामिंग दर दोन वर्षांनी केली जाते. २०१६ मध्ये मॉस्कोमध्ये रिलीज करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार, या नेत्यांच्या शवांना पहिल्यांदा एम्बामिंग करण्यासाठी साधारण २ लाख डॉलर म्हणजेच १ कोटी ४१ लाख रूपये खर्च आला होता. 

Web Title: Kim Jong Un father and grandfather dead bodies still safe in this palace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.