North Korea: किम जोंग उनच्या पत्नीच्या गळ्यात दिसलं रहस्यमय नेकलेस, काय आहे याचा मेसेज?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 10:31 AM2023-02-11T10:31:44+5:302023-02-11T10:37:45+5:30

Kim Jong Un Wife Necklace: मीडिया रिपोर्ट्सनुसार, किम जोंग उनची री सोल-जू कधी कधी पब्लिक समोर दिसते. पण ती जेव्हाही येते, चर्चेचा विषय ठरते.

Kim Jong Un wife Ri Sol Ju wearing missile shaped necklace pendant | North Korea: किम जोंग उनच्या पत्नीच्या गळ्यात दिसलं रहस्यमय नेकलेस, काय आहे याचा मेसेज?

North Korea: किम जोंग उनच्या पत्नीच्या गळ्यात दिसलं रहस्यमय नेकलेस, काय आहे याचा मेसेज?

googlenewsNext

Kim Jong Un Wife Necklace: उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनची पत्नी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिने गळ्यात घातलेला एक नेकलेस. जो रहस्यमयही आहे आणि काही संकेतही देत आहे. असं सांगितलं जात आहे की, हे एक मिसाइल नेकलेस आहे. याद्वारे एक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. याला उत्तर कोरियाची मिसाइल पॉवर दाखवण्याची एक पद्धत म्हटलं जातं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, किम जोंग उनची री सोल-जू कधी कधी पब्लिक समोर दिसते. पण ती जेव्हाही येते, चर्चेचा विषय ठरते. अशात गेल्या बुधवारी उत्तर कोरियाच्या 75व्या सैन्य समारोहादरम्यान दिसली. ती तिचा पती आणि मुलीसोबत दिसली. आणि नेकलेसच्या माध्यमातून जगाला संकेत दिला आहे.

रिपोर्ट्सनुसार, तिच्या गळ्यात मिसाइलचं नेकलेस दिसत आहे. असं करून तिने उत्तर कोरियाच्या परमाणु शक्तीबाबत अनोखा मेसेज दिला आहे. यावेळी मुख्य परेडआधी हा बॅलेस्टिक मिसाइलच्या आकाराचा पेंडेंट तिच्या गळ्यात दिसला. हा दिसल्यानंतर जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. वेगवेगळे दावे केले जात आहे.

एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, या नेकलेसचा आकार उत्तर कोरियाची सगळ्यात मोठी अंतर-महाद्विपीय बॅलिस्टिक मिसाइल ह्वासांग 17 ICBM सारखं आहे. या मिसाइलबाबत सांगितलं जातं की, ही अमेरिकासहीत अनेक देशांवर अणु हल्ला करण्यात सक्षम होती. असंही मानलं जातं की, ही मिसाइल अमेरिकेवर हल्ला करण्यासाठी तयार करण्यात आली होती.

Web Title: Kim Jong Un wife Ri Sol Ju wearing missile shaped necklace pendant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.