King Cobra Video: जीपच्या आता लपून बसला होता 10 फूट लांब किंग कोब्रा, बाहेर काढताच केला हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 01:40 PM2023-05-04T13:40:47+5:302023-05-04T13:55:01+5:30
King Cobra Attack Video: काही सर्पमित्र अशाही मोठ्या म्हणजे किंग कोब्रासारख्या सापांना पकडतात. किंग कोब्रासारख्या सापाला पकडणं फार अवघड काम असतं.
King Cobra Attack Video: सोशल मीडियावर सापांना रेस्क्यू करण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात काही असे विशाल साप असतात, ज्यांची कल्पनाही आपण कधी केलेली नसते. काही सर्पमित्र अशाही मोठ्या म्हणजे किंग कोब्रासारख्या सापांना पकडतात. किंग कोब्रासारख्या सापाला पकडणं फार अवघड काम असतं.
सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात 10 फूट लांब किंग कोब्रा जीपच्या खालच्या भागात जाऊन बसला होता. यात बघू शकता की, सर्पमित्र त्याला बाहेर काढतो. जे बघून तुम्ही अवाक् व्हाल...
व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, साप गाडीच्या खाली कॉइलमध्ये लपला आहे. सापाला पकडणारी व्यक्ती येते आणि एका काठीच्या मदतीने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. रेस्क्यू करण्यात आलेला व्हिडीओ आकाराने फारच मोठा दिसतो.
असं वाटतं की, किंग कोब्रा कमीत कमी 10 फूट लांब आहे. सर्पमित्र हळूहळू सापाला बाहेर काढतो आणि एका पिशवीत भरून त्याला नेतो. त्यानंतर त्याला जंगलात सोडतो. साप हे उष्णतेच्या शोधात असतात. कोणतंही वाहन हे सापांना लपण्यासाठी फार चांगलं ठिकाण आहे. कारण गाड्यांचा तापमान गाडी बंद केल्यानंतरही बराच वेळ जास्त असतं. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून 3 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.