'या' नदीतील पाण्यासोबत वाहत राहतं सोनं, श्रीमंत होण्यासाठी गर्दी करतात लोक!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 01:18 PM2023-02-18T13:18:17+5:302023-02-18T13:18:50+5:30
Gold River : आज आम्ही तुम्हाला एका नदीबाबत सांगणार आहोत, ज्या नदीतील पाण्यासोबत सोनंही वाहत पुढे जातं. ही नदी कॅनडातील डॉसन शहरात आहे.
Gold River : जगभरात सोनं म्हटलं की, कुणाचेही डोळे चमकतात. कारण हा एक महागडा आणि लोकांना आवडणारा सर्वात धातू आहे. सोन्याबद्दलच्या प्रत्येक गोष्टीची लोकांना उत्सुकता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एका नदीबाबत सांगणार आहोत, ज्या नदीतील पाण्यासोबत सोनंही वाहत पुढे जातं. ही नदी कॅनडातील डॉसन शहरात आहे.
बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, कॅनडातील डॉसन शहर हे पर्यटनासाठी पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. कदाचित यामुळेही कारण अनेकांना इथे श्रीमंत होण्याची संधी मिळाली. आता श्रीमंत होण्याची गोष्ट तुमचेही कान टवकारले असतील ना? आणि सोबतच या ठिकाणाबाबत जाणून घेण्याचीही उत्सुकता वाढली असेल.
डॉसन हे शहरातील लोकसंख्या कमी असून हे शहर क्लोनडाइक नदीच्या किनारी वसलं आहे. असे सांगितले जाते की, या नदीच्या तळात सोनं असतं. १८९६ मध्ये जॉर्ज कार्मेक, डॉसन सिटी चार्ली आणि स्कूकम जिम मेसन यांनी सर्वात पहिले या नदीत सोनं असल्याचं सांगितलं होतं. तेव्हापासून इथे सोनं शोधणाऱ्यांची गर्दी होऊ लागली.
सोन्याच्या या नदीजवळ जमा झालेली वाळू लोक बाकेटित भरून नेतात आणि ती गाळतात. त्यातून सोन्याचे तुकडे वेगळे केले जातात. सोन वेगवेगळ्या रूपात यात आढळतं. ते मोत्यासारखंही दिसू शकतं. तसंच पातळ वस्तूसारखंही दिसू शकतं. असं नाही की, प्रत्येक वेळी सोनं सापडतंच. कधी कधी खूप मेहनत करूनही काही हाती लागत नाही. काही लोक तर इथे जमीन विकत घेतात कारण तिथे सापडणाऱ्या सोन्यावर त्यांचा हक्क रहावा.
आज एक चमचा चहा पावडर इतकं सोनं इथे १३०० डॉलरला विकलं जातं. डॉने मिशेल, डॉसन सिटीमध्ये १९७७ मध्ये आले होते. ते सोनं काढण्याचं काम करतात. ते आता पर्यटकांना सोनं कसं शोधावं हे शिकवतात. ते सांगतात की, दिवसभर कामासाठी ते शेजारच्या शहरात जातात आणि सुट्टीच्या दिवशी सोनं शोधतात.
डॉसन शहरात नेहमीच मोठ्या प्रमाणात सोन्यासाठी खोदकाम केलं जात आहे. आजही यूकॉनच्या १९६ मायनिंग साइटपैकी १२४ डॉसन शहरात आहेत. बोनांजा क्रीक डिस्ट्रिक्ट यांच्याही सर्वात जास्त खदाणी इथे आहेत. मिशेलनुसार, सोनं शोधण्याचं काम इथे अजून बरीच वर्ष चालणार आहे.