कमाल! हल्ल्याच्या 30 तासांनंतर मल्लिकाच्या शरीरातून डॉक्टरांनी काढला चाकू, तब्बल 3 तास चालली सर्जरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 02:42 PM2020-06-18T14:42:23+5:302020-06-18T14:48:46+5:30

मल्लिकावर 25 मे रोजी हल्लेखोरांनी हल्ला केला होता. तिच्या शरीरात चाकू मारण्यात आला होता.

Knife removed from woman chest 30 hours after stabbing krishnagiri Tamil Nadu | कमाल! हल्ल्याच्या 30 तासांनंतर मल्लिकाच्या शरीरातून डॉक्टरांनी काढला चाकू, तब्बल 3 तास चालली सर्जरी

कमाल! हल्ल्याच्या 30 तासांनंतर मल्लिकाच्या शरीरातून डॉक्टरांनी काढला चाकू, तब्बल 3 तास चालली सर्जरी

Next

एका महिलेच्या शरीरातून डॉक्टरांनी घटनेच्या तब्बल 30 तासांनंतर एक चाकू काढला. 3 तासांच्या सर्जनीनंतर डॉक्टरांनी हा चाकू बाहेर काढला. ही घटना तामिळनाडूच्या कृष्णागिरी जिल्ह्यातील होसुर येथे घडली. महिलेचं नाव मल्लिका असून तिचं वय 40 सांगण्यात आलं आहे.

मल्लिकावर 25 मे रोजी हल्लेखोरांनी हल्ला केला होता. तिच्या शरीरात चाकू मारण्यात आला होता. पण तिला याची अजिबात कल्पना नव्हती की, संपूर्ण रात्र चाकू तिच्या छातीत राहिल्यावर ती वाचेल की नाही. घटनेच्या 24 तासांनंतर कोयम्बटूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या डॉक्टरांना 3 तासांच्या सर्जरीनंतर महिलेच्या शरीरातून चाकू काढण्यात यश मिळालं.

सर्जरीच्या 3 दिवसांनंतर महिलेला हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आली आहे. मल्लिकाला आधी सलेमच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. तेथून कोयम्बटूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगण्यात आले होते.

हा चाकू 6 इंचापेक्षा अधिक लांबीचा होता. महिलेच्या फुप्फुसाच्या छोट्या भागात चाकूमुळे छिद्र पडलंय. सुदैवाने महिलेच्या हृदयाला काहीही इजा झाली नाही. डॉ. श्रीनिवासन आणि एनेस्थिसियोलॉजचे प्रमुख डॉ. जयशंकर नारायणन यांच्या नेतृत्वात ही सर्जरी केली गेली.

बोंबला! थेट पोलिसांसमोरच त्याने गॅस पास केला; अन् मग पोलिसांंनी 'असा' वसूल केला दंड

बाबो! तरूणीने एका बुक्कीत फोडली हवेतील विमानाच्या खिडकीची काच, इतर प्रवाशी 'कोमात'...

Web Title: Knife removed from woman chest 30 hours after stabbing krishnagiri Tamil Nadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.