आली रे आली आता 'instant' अंडरवेअर आली! ना धुवायची झंझट ना सुकवायची कटकट....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 11:15 AM2020-01-16T11:15:11+5:302020-01-16T11:21:31+5:30
आपण आपल्या अंतर्वस्त्रांच्या बाबतीत नेहमीच जागरूरक असतो.
आपण आपल्या अंतर्वस्त्रांच्या बाबतीत नेहमीच जागरूरक असतो. नेहमी मोकळे आणि कंम्फरटेबल वाटेल असे कपडे आपल्याला हवे असतात. कारण घट्ट किंवा वापरण्यास कठिण कपडे जर असतील तर आपण दिवसभर बाहेर वावरताना आरामदायक फिल करत नाही. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे अंतर्वस्त्र येत असतात. आपण नेहमीच आपल्याला वापरायला आरामदायक असेल असे कपडे घेत असतो. आज आम्ही तुम्हाला अंतर्वस्त्रांच्या अशा प्रकाराबद्दल सांगणार आहोत ज्यांचा वापर करणं तुम्हाला अधिक सोईस्कर ठरणार आहे.
(image credit- youtube)
सध्या बाजारात एका इंस्टंट अंडरवेअरची चर्चा रंगली आहे. तुम्हाला ऐकून विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. या इंस्टंट अंडरवेअर बद्दल वाचून तुम्ही हैराण व्हाल. या इंस्टंट अंडरवेअर मुळे तुमचे थंडीच्या दिवसात अंडरवेअर धुण्याची समस्या दूर होणार आहे. जर तुम्ही कुठेही बाहेर जाण्याचा प्लॅन केलात किंवा पावसात भिजलात तर घातलेले कपडे स्वतःचे स्वतः धुवायलाच लागतात.
(image credit- youtube)
पण जर तुम्हाला अंडरवेअर धुण्याचा कंटाळा येत असेल तर तुमच्यासाठी ही इंस्टंट अंडरवेअर फायदेशीर ठरणार आहे. ही अंडरवेअर धुण्यासाठी तुम्हाला कोणतेही कष्ट घ्यावे लागणार नाहीत. तसंच या अंडरवेअरचा आकार फारच लहान आहे त्यामुळे तुम्ही ही अंडरवेअर पाकीटात सुद्धा ठेवू शकता. (हे पण वाचा-लग्नात नवरदेव घोडीवरच बसून का येतात, घोड्यावर का नाही? तुम्हाला माहीत आहे का कारण?)
(image credit- youtube)
इंस्टंट अंडरवेअर ही कम्प्रेस्ड अवस्थेत असते. एक लहानसा गोळा असतो. या गोळ्याला आकार येण्यासाठी तुम्ही पाण्यात भिजवून ठेवू शकता. एक ग्साल पाण्यात हा गोळा ठेवल्यानंतर लगेज त्याला अंडरवेअरचा आकार येईल. या गोळ्याला आकार आल्यानंतर ते प्लास्टिकसारखं दिसायला सुरूवात होईल. पण तुमच्या कंमरेवर बसण्यास उत्तम ठरेल. या अंडरवेअरचं मटेरियल खूप पातळ आहे. त्यामुळे ते १५ मिनिटांत सुकतं. जर तुम्हाला ही अंडरवेअर हवी असेल तर बाजारात सहजासहजी उपलब्ध होणार नाही. त्यासाठी तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. कारण वेगवेगळ्या शॉपिंग साईटवर तुम्हाला ही अंडरवेअर सहज उपलब्ध होईल. (हे पण वाचा - पॉवर वाढवण्यासाठी त्याने घेतलं रेड्याचं औषध, तीन दिवस हॉस्पिटलमध्ये बसला बोंबलत )