Viral Image : अजब व्यक्तीचा गजब कारनामा, ११ लाख रूपये खर्च करून बनला श्वान; फरक करणं अवघड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 02:00 PM2022-05-25T14:00:02+5:302022-05-25T14:04:09+5:30
Japan Man Viral Image: एका व्यक्तीनं श्वानासारखं दिसण्यासाठी तब्बल ११ लाख रूपयांचा खर्च केला.
Japan Man Viral Image: जगात असे अनेक लोक आहेत, जे काही ना काही कारणांमुळे चर्चेत येतात. अशीच एक व्यक्ती जपानमध्ये आहे, जी सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. वास्तविक, जपानमधील ही व्यक्ती श्वान बनली आहे. हे ऐकायला खूप विचित्र वाटेल, पण हे अगदी खरं आहे. हे सर्व कसं झालं ते पाहूया.
मिळालेल्या माहितीनुसार, जपानमधील या व्यक्तीचे नाव टोको आहे. या व्यक्तीला श्वानासारखे दिसणे इतके आवडते की त्याने यासाठी तब्बल ११ लाख रुपये खर्च केले. इतके पैसे खर्च करून त्याने असा पोशाख बनवला आहे, जो परिधान करून तो अगदी एखाद्या श्वानाप्रमाणे त्र्दिसतो. त्याला कोणी ओळखू शकत नाही. टोकोने आपल्या ट्विटर हँडलवरून हे नवं रुप धारण केल्यानंतरचे फोटोही शेअर केले आहेत.
【制作事例 追加】
— 特殊造型ゼペット (@zeppetJP) April 11, 2022
犬 造型スーツ
個人の方からのご依頼で、犬の造型スーツを制作しました。
コリー犬をモデルにしており、本物の犬と同様に四足歩行のリアルな犬の姿を再現しております🐕
詳細はこちら:https://t.co/0gPoaSb6yn#犬#Dog#着ぐるみ#特殊造型#特殊造形pic.twitter.com/p9072G2846
असं का केलं?
त्या व्यक्तीचे असे फोटो पाहून तुम्ही विचार करत असाल की त्याने असे का केले? खरं तर, त्या व्यक्तीला लहानपणापासून प्राण्यांची आवड आहे. त्याला नेहमी प्राण्यासारखे जगण्याची इच्छा होती. प्राण्यांमध्येही त्याला श्वान सर्वात जास्त आवडायचा. या छंदामुळे, त्याने स्पेशल इफेक्ट्स वर्कशॉप Zeppet शी संपर्क साधला आणि स्वत:साठी श्वानासारखा अल्ट्रा रिअॅलिस्टिक पोषाखही तयार करवून घेतला.
४० दिवसांत पोषाख तयार
या पोषाखात त्याला ओळखणंही कठीण आहे. तसंच Zeppet कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार तो पोषाख तयार करताना सिंथेटिक मटेरिअलचा वापर करण्यात आला आहे. कंपनीला हा पोषाख तयार करण्यास ४० दिवसांचा कालावधी लागला. कंपनीनं यासाठी २ मिलियन येन म्हणजेच जवळपास ११ लाख ६३ हजार रुपये आकारले.