नॉलेज! गुन्हेगारांसाठी वापरल्या जाणाऱ्या 'गुंडा' शब्दाचा जन्म कसा झाला, जाणून घ्या कथा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 03:44 PM2021-09-08T15:44:52+5:302021-09-08T15:45:21+5:30
पोलिसांबाबतही नकारात्मक शब्द वापरायचा असेल तर त्यासाठी पोलिसवाला गुंडा म्हटलं जातं. पण तुम्ही कधी विचार केला का की, गुंडा शब्दाचा जन्म कुठून झाला.
बदमाश लोकांसाठी एका शब्दाचा फार जास्त वापर होतो आणि तो शब्द आहे गुंडा. या गुंडा शब्दापासूनच गुंडागर्दी सारखे शब्द तयार झाले. म्हणजे एक गोष्ट तर स्पष्ट आहे की, गुंडा शब्द, बदमाश, दादागिरी इत्यादींसाठी वापरला जातो. आता तर याला नकारात्मकेसाठीही वापरला जातो. पोलिसांबाबतही नकारात्मक शब्द वापरायचा असेल तर त्यासाठी पोलिसवाला गुंडा म्हटलं जातं. पण तुम्ही कधी विचार केला का की, गुंडा शब्दाचा जन्म कुठून झाला.
जर गुंडा शब्दाची कहाणी वाचली तर इंटरनेटवर अनेक तथ्य आहेत. गुंडा शब्दाची उत्पत्तीबाबत अनेक कथा सांगितल्या जातात. जास्तीत जास्त आर्टिकल आणि लेखांमध्ये बदमाशच्या अर्थात वापरला जाणारा गुंडा शब्द पश्तो भाषेतील आहे. पण काही लेख असेही आहेत ज्यात सांगण्यात आलं आहे की, हा पश्तो भाषेतील शब्द नाही. अशात चला जाणून घेऊ गुंडा
शब्दाबाबत काही तर्क...
काय आहे याचा अर्थ? - 'गुंड' चा अर्थ गाठ किंवा उथळ असण्याशी आहे. एखाद्या समतोल जागेवर उथळ जागा असेल तर त्यालाठी गुंडा शब्दाचा वापर केला जातो. असाच समाजात मोठा झालेला व्यक्ती, ज्याची प्रतिष्ठा जास्त आहे त्याच्यासाठीही गुंडा शब्दाचा वापर होतो. याला शूरवीर, योद्धा म्हणून पाहिलं जातं. म्हणजे शाब्दिक अर्थात याचा निगेटिव्ह वापर नाहीये. पण आता याचा नकारात्मकपणे वापर केला जातो.
असं म्हटलं जातं की, पश्तो भाषेतून हा शब्द आला आहे आणि पश्तो भाषेत याचा अर्थ बदमाश व्यक्ती असा होता. त्यामुळे याचा वापर नकारात्मक भावार्थाने केला जातो. पण दक्षिण भारतात असं नाहीये. इथे याला भांडखोर नाही तर एक योद्धा म्हणून पाहिलं जातं. तमिळमद्ये गुंडा शक्तीशाली नायकाचा आहे. जसे की, गुंडराव, गुंडराज इत्यादी. मराठीत 'गाव-गुंड' ग्राम योद्धा असतो. इथे गुंडाचा अर्थ मुळात प्रधान किंवा नेत्याचा भाव आहे. अशात असं म्हटलं जाऊ शकतं की, गुंडा शब्दाचा वापर केवळ नकारात्मक शब्दासाठी होत नाही.
पश्तो नाही गुंडा शब्द - इंटरनेटवरील एका आर्टिकलमध्ये सांगण्यातत आलं आहे की, गुंडा पश्तो शब्द नाही. सोबतच असंही सांगण्यात आलं आहे की, वर्ष १९१० आधी गुंडा शब्दाचा वापर केला जात नव्हता. इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये गुंडा शब्दाचं प्रचलन १९२० च्या जवळपास सुरू झालं. त्याआधी याचा उल्लेख नाही.
या व्यक्तीपासून आलं गुंडा नाव? - काही कथांमध्ये सांगण्यात आलं आहे की, १९१० दरम्यान बस्तरच्या गुंडा धूरच्या नावाहून हे नाव पडलं. त्यावेळी त्यांनी इंग्रजांना हाकलून बाहेर करण्याचा निश्चय केला होता आणि इंग्रज सरकारने त्याला व्हिलन व्यक्ती मानून गुंडा ठरवलं. त्यानंतर या शब्दाचं चलन आलं असं म्हणतात.