LPG सिलिंडरच्या खालच्या बाजूला 'ही' छिद्रे कशासाठी असतात? 99 टक्के लोकांना माहीत नाही, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 09:34 AM2022-07-28T09:34:16+5:302022-07-28T09:39:24+5:30

LPG Cylinder Facts: सिलिंडरच्या या खालच्या भागावर ही छिद्रे कशासाठी दिलेली असतात, यासंदर्भात कधी आपण विचार केलाय? कारण ही छिद्रे म्हणजे डिझाईन नाही, तर ही छिद्रे देण्यामागे वैज्ञानिक कारण आहे.

Know about the LPG cylinder facts why are there holes at the bottom of a lpg gas cylinder | LPG सिलिंडरच्या खालच्या बाजूला 'ही' छिद्रे कशासाठी असतात? 99 टक्के लोकांना माहीत नाही, जाणून घ्या

LPG सिलिंडरच्या खालच्या बाजूला 'ही' छिद्रे कशासाठी असतात? 99 टक्के लोकांना माहीत नाही, जाणून घ्या

googlenewsNext

आज अनेक घरांमध्ये लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस अर्थात LPG चा वापर केला जातो. याच्या सहाय्यानेच बहुतांश घरांमध्ये दैनंदीन स्वयंपाक केला जातो. जर, आपण या गॅसच्या सिलिंडरकडे काळजीपूर्वक पाहिले, तर लक्षात येईल की सिलिंडरच्या खालच्या बाजूला काही छिद्रे दिलेली आहेत. याच खालच्या भागावर संपूर्ण सिलिंडरचा भार असतो. पण सिलिंडरच्या या खालच्या भागावर ही छिद्रे कशासाठी दिलेली असतात, यासंदर्भात कधी आपण विचार केलाय? कारण ही छिद्रे म्हणजे डिझाईन नाही, तर ही छिद्रे देण्यामागे वैज्ञानिक कारण आहे.

काय आहे वैज्ञानिक कारण - 
खरे तर सिलिंडरवर देण्यात आलेली ही छिद्रे अत्यंत कामाची असतात. सिलिंडरमधील LPG गॅसचे तापमान नियंत्रित करण्यासाठी या छिद्रांचा वापर केला जातो. अनेक वेळा गॅस सिलिंडरचे तापमान वाढते. अशात या छिद्रांमधून हवा पास होते, यामुळे निर्माण झालेले तापमाण कमी होण्यास मदत होते. याच बरोबर, ही छिद्रे जमिनीवरील उष्णतेपासूनही सिलिंडरला प्रोटेक्शन देते. एकूणच काय तर, ही छिद्रे अँक्सिडेंट होण्यापासून सिलिंडरचा बचाव करतात.

असाही फायदा - 
याशिवाय, सिलिंडरच्या खालच्या बाजूला छिद्रे असण्याचा आणखीही एक फायदा आहे. या छिद्रांमुळे सिलिंडरच्या खाली साफ सफाई करणेही सोपे होते. कारण जेव्हा आपण आपली फरशी पाण्याने धुता, तेव्हा या छिद्रांमुळे पाणी सिलिंडरखाली साचत नाही.

सिलिंडरला का दिला जातो विशेष रंग?
कधी आपण विचार केलाय, की घरगुती LPG सिलिंडरला लाल रंगच का असतो. तर यालाही एक वैज्ञानिक कारण आहे. अत्यंत दुरुनही सहज स्पष्टपणे दिसून यावे, म्हणून याला लाल रंग दिला जातो. यामुळे सिलिंडरचे ट्रांसपोर्टेशन सोपे होते.

Web Title: Know about the LPG cylinder facts why are there holes at the bottom of a lpg gas cylinder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.