Haunted Highway: हा आहे जगातील सर्वात भयावह महामार्ग, चालत्या कार होतात गायब! जाणून घ्या, रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 03:07 PM2022-09-25T15:07:10+5:302022-09-25T15:08:35+5:30
The Devils Highway: अमेरिकेतील या हायवे क्रमांक 666 चे नाव, मे 2013 मध्ये बदलून 491 करण्यात आले आहे.
आपण आजवर अनेक भयावरह ठिकाणांसंदर्भात ऐकले असेल. मात्र, अमेरिकेतील हायवे क्रमांक 666 संदर्भात आपल्याला क्वचितच काही माहिती असेल. खरे तर हा जगातील सर्वात भयावह महामार्ग आहे. आतापर्यंत येथून अनेक हृदयद्रावक घटना समोर आल्या आहेत. या महामार्गाचा इतिहास अत्यंत जुना असून हा महामार्ग 'डेव्हिल्स रोड अथवा द डेव्हिल्स हायवे' नावाने ओळखला जातो. आज आम्ही आपल्याला याच महामार्गाचा इतिहास सांगणार आहोत. तसेच, येथे लोक आणि वाहने का गायब होतात यासंदर्भात माहिती देणार आहोत.
बदलण्यात आले आहे हायवेचे नाव -
अमेरिकेतील या हायवे क्रमांक 666 चे नाव, मे 2013 मध्ये बदलून 491 करण्यात आले आहे. खरे तर या हायवेला हा क्रमांक 1926 मध्ये देण्यात आला होता. हा महामार्ग सुरू झाल्यापासूनच यावर मोठ्या प्रमाणावर अपघात होत होते. एवढेच नाही, तर चलत्या बाइक आणि कार आदि गायब होत होत्या.
म्हणून बदलावं लागलं नाव -
द डेव्हिल्स हायवेवर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे येथील लोकांनी या हायवेचा क्रमांक बदलण्याची मागणी केली होती. कारण या सर्व घटना हायवेचा अशुभ क्रमांकच जबाबदार आहे, असे या लोकांचे म्हणणे होते. यामुळे, हायवेचा क्रमांक बदलण्यात आला, त्यानंतर येथील अपघातांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.
गायब झाली होती पियर्स-एरो रोडस्टर कार -
या हायवेवरून 1930 मध्ये एक काळ्या रंगाची पियर्से-एरो रोडस्टर कार अचानक गायब झाली होती. यानंतर या कारचा बराच शोध घेतला गेला. मात्र, तरीही ती सापडली नाही, असे या हायवेसंदर्भात बोलले जाते.
असे आहे हायवेचे रहस्य -
हायवेवर होत असलेल्या अपघातांन हीच कार जबाबदार असल्याचे, म्हटले जाते. या हायवेवर होत असलेल्या घटनांची भीती एवढी वाढली आहे, की लोक आजही येथे जाण्यास घाबरतात.