पतीला कंट्रोलमध्ये कसे ठेवावे? जाणून घ्या, विवाहित महिला गुलगलवर काय-काय प्रश्न सर्च करतात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 09:52 PM2022-09-01T21:52:07+5:302022-09-01T21:54:13+5:30

Married Women Most Google Searches : आपल्या पतीसंदर्भात Google वर नेमकं काय काय जाणून घेऊ इच्छितात विवाहित महिला? जाणून घ्या...

Know about the what married women search most on google right time for pregnancy how to control husband and more | पतीला कंट्रोलमध्ये कसे ठेवावे? जाणून घ्या, विवाहित महिला गुलगलवर काय-काय प्रश्न सर्च करतात

पतीला कंट्रोलमध्ये कसे ठेवावे? जाणून घ्या, विवाहित महिला गुलगलवर काय-काय प्रश्न सर्च करतात

Next

आपण आपल्या अनेक प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी Google चा वापर करतो. खरे तर गूगल आपल्याला सर्च हिस्ट्री डेलीट करण्याचीही संधी देते. पण, आपण सर्च केलेली प्रत्येक माहिती गूगलवर कुठेना कुठे नक्कीच सेव्ह होते. यासंदर्भात अनेक जणांनी केलेला अभ्यास समोर आला आहे. यात विवाहित महिला Google वर सर्वात जास्त काय सर्च (What do Married Women Search on Google) करतात, हे आढळून आले आहे. तार जाणून घेऊयात, विवाहित महिला गूगलवर नेमके काय सर्च करतात. त्यांचे प्रश्न कशा प्रकारचे असतात.

आपल्या पतीसंदर्भात Google वर नेमकं काय काय जाणून घेऊ इच्छितात विवाहित महिला? -
गूगल (Google) डेटानुसार, विवाहित महिला आपल्या पतीला आपल्या कंट्रोलमध्ये कसे ठेवावे? त्यांना 'जोरू का गुलाम' कसे बनवावे? हे सर्वाधिक सर्च करतात. एवढेच नाही, तर त्यांच्या पतीला काय आवडते, त्याची चॉईस काय आहे आणि त्याला कोणत्या गोष्टी आवडत नाहीत, हे जाणून घेण्याचीही त्यांची इच्छा आहे. 
 
विवाहित महिला, पतीचे मन कसे जिंकावे? त्यांना कशा प्रकारे खूश करावे? याशिवाय, कुटुंब वाढवण्यासंदर्भातील निर्णय केव्हा घ्यायला हवा आणि मुलांना जन्माला घालण्याची योग्य वेळ कोणती असू शकते? असे प्रश्नही गूगलवर अनेक वेळा विचारण्यात आले आहेत.

गूगलला विचारले जातात असे प्रश्न -
वर सांगितलेल्या प्रश्नांशिवाय, लग्नानंतर आपल्या नवीन कुटुंबासोबत कसे रहावे? लग्नानंतर स्वतःचा बिझनेक कसा चालवावा? बिझनेसह कुटुंब कसे सांभावाळावे? असे प्रश्नही विवाहित महिला गूगलवर सर्च करतात.

Web Title: Know about the what married women search most on google right time for pregnancy how to control husband and more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.