काय सांगता इन्स्टाग्रामला फोटो पोस्ट केल्यावर जेवण फुकट.... तुम्ही जाऊन आलात का 'इथे'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 01:19 PM2019-12-08T13:19:53+5:302019-12-08T13:38:24+5:30

आत्तापर्यंत तुम्ही भरपूर रेस्टॉरंटबद्दल ऐकलं असेल. जिथे आपल्या कडचं प्लास्टीक जमा केल्यानंतर जेवण मोफत मिळतं.

Know about Thisisnotasushibar restaurant | काय सांगता इन्स्टाग्रामला फोटो पोस्ट केल्यावर जेवण फुकट.... तुम्ही जाऊन आलात का 'इथे'

काय सांगता इन्स्टाग्रामला फोटो पोस्ट केल्यावर जेवण फुकट.... तुम्ही जाऊन आलात का 'इथे'

Next

(Imagecredit- OJLa)

आत्तापर्यंत तुम्ही भरपूर रेस्टॉरंटबद्दल ऐकलं असेल. जिथे आपल्या कडचं प्लास्टीक जमा केल्यानंतर जेवण मोफत मिळतं. पण तुम्ही असं ऐकलय का जिथे इन्स्टाग्रामला फोटो पोस्ट केल्यानंतर जेवण मोफत मिळतं. सोशल मिडीयावर फोटो पोस्ट केल्यानंतर आपल्याला जेवण फुकट मिळणार. हे फारच काल्पनिक आणि विनोदी वाटत असलं तरी पण हे खरं आहे. 

(Image credit- Oddity central)

इटलीतील एका प्रसिध्द मिलान या शहरात हे रेस्टॉंरंट आहे. या रेस्टॉरंटचं नाव 'दिस इज नॉट अ सुशी बार' असं आहे.  जे रेस्टॉरंट मैटियो आणी तोमासो पिट्टरेल्लो या दोन भावांनी मिळून सुरू केलं. गेल्या एका वर्षात हे रेस्टॉरंट चांगलं चाललं आहे. याठिकाणी  फोटो टाका आणि पोटभर जेवा. असा व्यवहार चालतो.

या रेस्टॉरंटला गेल्यानंतर फुकट जेवण्यासाठी आधी एक प्लेट काही स्नॅक्स किंवा जेवण ऑर्डर करायला लागतं . त्यानंतर त्या रेस्टॉरंटचा फोटो काढून इन्स्टाग्रामला  #Thisisnotasushibar या हॅशटॅगसह आपल्या इन्स्टाग्रामला अपलोड करावी लागते.

साधारणपणे इन्स्टाग्रामला तुमचे जितके जास्त फॉलोअरर्स असतील. तसंच त्या फोटोला जेव्हढे जास्त लाईक्स असतील तेवढ्या प्रमाणात तुम्हाला खाण्याचे पदार्थ मोफत मिळतील. जर तुमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला त्या रेस्टॉरंटच्या आणि रेस्टॉरंटमध्ये मागवलेल्या पदार्थाच्या फोटाला १००० ते ५००० च्या संख्येत फॉलोअरर्स मिळाले. तर एक पदार्थ मोफत मिळतो. तसंच जर त्या फोटाला ५००० ते १०००० च्या संख्येत फॉलोअरर्स मिळाले. तर चार प्लेट पदार्थ आणि १ लाखाच्या संख्येत फॉलोअरर्स असतील तर तुम्ही चक्क आठ प्लेट मोफत जेवणाचा आनंद घेता येऊ शकता.

Web Title: Know about Thisisnotasushibar restaurant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.