शिंकण्याच्या पद्धतीवरून समजते तुमची पर्सनॅलिटी, जाणून घ्या काय आहे रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 05:01 PM2021-10-05T17:01:05+5:302021-10-05T17:03:20+5:30
शिंकण्याची पद्धत तुमच्या पर्सनॅलिटीबाबत खूपकाही सांगते. याबाबत ब्रिटनचे बॉडी लॅंग्वेज एक्सपर्ट रॉबिन करमोड यांनी त्यांच्या पुस्तकात उल्लेख केला आहे.
हिवाळ्यात शिंका (Sneezing) येणे एक सामान्य बाब आहे. तशा तर उन्हाळ्यात आणि पावसाळ्यातही शिंका येतातच. काही लोक शिंकतात तेव्हा जोरात आवाज येतो, तेच काही लोक फार हळुवार शिंकतात. याबाबत एक अनोखी गोष्ट जाणून घेतल्यावर तुम्ही हैराण व्हाल. म्हणजे शिंकण्याची पद्धत तुमच्या पर्सनॅलिटीबाबत (Personality) खूपकाही सांगते. याबाबत ब्रिटनचे बॉडी लॅंग्वेज एक्सपर्ट रॉबिन करमोड यांनी त्यांच्या पुस्तकात उल्लेख केला आहे.
शिंकण्याच्या आवाजासोबतच शिंक आल्यावर व्यक्ती कसा व्यवहार करतो, यातून तुमच्या पर्सनॅलिटीबाबत जाणून घेता येतं. रॉबिन करमोड यांच्यानुसार, असे लोक जे फार हळुवार शिंकतात, त्यांचा स्वत:वर फार कंट्रोल असतो आणि ते हाच प्रयत्न करतात की, त्यांच्यामुळे कुणालाही त्रास होऊ नये. तेच जोरात शिंकणारे लोक सेंटर ऑफ अट्रॅंक्शन बनण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी ते अजब कामही करतात.
शिंका रोखणारे कसे असतात?
काही लोक शिंका रोखण्याचा प्रयत्न करतात. पण मेडिकल सायन्सनुसार असं करणं चांगलं नसतं. शिंक रोखण्याचा प्रयत्न करणारे लोक अंतर्मुख स्वभावाचे असतात. त्यांना असं रहायचं असतं की, त्यांच्या असण्याची कुणाला जाणीव होऊ नये. ते स्वत:च स्वत:ची कंपनी एन्जॉय करतात. यात ते माहीर असतात.
तसेच शिंकल्यानंतर सॉरी किंवा एक्सक्यूज मी जे बोलतात ते लोक शांत आणि सभ्य असतात. असे लोक कधीही दुसऱ्या लोकांच्या आयुष्यात लुडबुड करत नाही.