बाबो! इथे चक्क हत्तीच स्वेटर आणि पायजमा घालून तयार झालाय... तुम्ही पाहिला का असा हत्ती?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 02:37 PM2019-12-30T14:37:31+5:302019-12-30T14:39:34+5:30
हिवाळा सुरू होऊन २ महिने झाले आहेत. दिवसेंदिवस थंडीचा तडाखा वाढत चालला आहे.
हिवाळा सुरू होऊन २ महिने झाले आहेत. दिवसेंदिवस थंडीचा तडाखा वाढत चालला आहे. वातावरणात बदल झाल्यामुळे गारवा पसरला आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो. तसंच स्वेटर, कानटोपी, मोजे यांचा वापर आपण थंडीपासून बचाव होण्यासाठी करत असतो.
आपल्या प्रमाणेच विविध प्राण्यांना थंडीचा फटका बसत असतो. त्यामुळे या फोटोतील काही स्त्रियांनी चक्क हत्तीला थंडी वाजू नये म्हणून स्वेटर घातलं आहे. मथूरा या ठिकाणी थंडीपासून वाचण्यासाठी हत्तीला रंगेबीरगी स्वेटर घातले आहे. हा फोटो खूप गाजत आहे. खूप लोकांचे आकर्षण ठरला आहे. कशा पध्दतीने हत्तीची काळजी घेण्यात आली आहे. हे या फोटोतून दिसून येत आहे.
या फोटोला सोशल मिडियावर आईएफ़एस ऑफ़िसर प्रवीण कासवान यांनी शेअर केला आहे. या फोटोच हत्तीसोबत काही महिला दिसत आहेत. हा फोटो पोस्ट करत असताना -'इंक्रेडिबल इंडिया' असं कॅप्शन दिले आहे. स्वेटर सोबतच या हत्तीला एक लाल रंगाचा पायजमा सुध्दा शिवला आहे. तसंच अनेकांनी या फोटोला कूल फोटो असं संबोधलं आहे.