डास एकावेळी मनुष्याचं किती रक्त पितो? उन्हाळ्यातच जास्त का चावतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 03:41 PM2024-04-18T15:41:31+5:302024-04-18T16:04:24+5:30

डास रात्रभर आपलं रक्त पिऊन त्यांचं पोट भरतात आणि त्यांची संख्या वाढवतात. पण एक डास एकावेळी तुमचं किती रक्त पितो हे तुम्हाला माहीत नसेल.

Know how much human blood does a mosquito drink at one time | डास एकावेळी मनुष्याचं किती रक्त पितो? उन्हाळ्यातच जास्त का चावतात?

डास एकावेळी मनुष्याचं किती रक्त पितो? उन्हाळ्यातच जास्त का चावतात?

उन्हाळा सुरू झाला की, डासांची समस्या खूप जास्त वाढते. रात्रभर डास शांतपणे झोपू देत नाही. पण त्यांची चांगलीच मजा होते. घरातील कानाकोपऱ्यात डास लपून बसलेले असतात. पण सगळेच डास चावत नाहीत. मादा एडीज एजिप्टी प्रजातीचे डास चावल्याने डेंग्यूसारखा गंभीर आजार होतो.

तर मादा एनोफिलीज डास चावल्याने मलेरियासारखा आजार होतो. याशिवाय काही सामान्य डासही आपल्याला चावतात ज्यामुळे खाज आणि वेदना होतात. डासांनी चावल्यावर तिथे पुरळही येते. डास रात्रभर आपलं रक्त पिऊन त्यांचं पोट भरतात आणि त्यांची संख्या वाढवतात. पण एक डास एकावेळी तुमचं किती रक्त पितो हे तुम्हाला माहीत नसेल किंवा त्या रक्ताचं काय होतं हेही माहीत नसेल. तेच आज आम्ही सांगणार आहोत.

एकावेळी किती रक्त पितो डास

डासांचा आहार असतो मनुष्यांचं किंवा त्वचा असलेल्या इतर प्राण्यांचं रक्त. डास त्यांच्या शरीराच्या तीन पट जास्त रक्त पिऊ शकतात. एका डासाचं सरासरी वजन 6 मिलीग्रामच्या जवळपास असतं. एक डास एकावेळी चावला तर शरीरातून 1 ते 10 मिलीग्राम रक्त पिऊ शकतो. म्हणजे पूर्ण पोट भरण्यासाठी त्याला तीन ते चार वेळा व्यक्तीला चावावं लागतं. डासांना दात नसतात ते आपल्या तोंडात असलेल्या एका टोकदार दंशाने रक्त पितात.

काय होतं रक्ताचं?

डासांना जिवंत राहण्यासाठी रक्त फार महत्वाचं आहे. रक्तामुळे त्यांना प्रजननात मदत मिळते. रक्तात असलेलं प्रोटीन मादा डासांना प्रजनन करण्यास मदत करतं. तुम्हाला माहीत नसेल, पण केवळ फीमेल म्हणजे मादा डासच मनुष्यांचं रक्त पितात. रक्त प्यायल्यानंतर काही दिवस ते आराम करतात. जेव्हा रक्त पचतं तेव्हा अंडे विकसित होतात. ते त्या पाण्यात सोडतात ज्यातून आणखी डासांचा जन्म होतो.

उन्हाळ्यात जास्त का चावतात डास?

प्रजनन वाढतं

उन्हाळ्यात डास जास्त चावण्याचे हे एक मुख्य कारण आहे. उन्हाळा हा डासांचा प्रजननाचा काळ असतो. खासकरून उन्हाळ्याच्या सुरूवातीला डास प्रजनन करतात. अशात मादा डासांना अंडी देण्यासाठी रक्ताची गरज असते आणि याच कारणामुळे उन्हाळ्यात डास जास्त चावतात. यानंतर डासांची संख्याही वाढते. याच कारणाने सांयकाळ झाली तर डासांची संख्या वाढते.

घामामुळे...

घाम डास जास्त चावण्याचं दुसरं मोठं कारण आहे. उन्हाळ्यात व्यक्तीच्या शरीरातून जास्त घाम निघतो आणि या घामाच्या वासामुळे डास व्यक्तीकडे आकर्षित होतात. तुमच्या अंगावर घाम असेल किंवा तुम्ही घामाचे कपडे घातले असतील तर डास तुमच्याकडे जास्त येतात.

कपड्यांमुळे...

हिवाळ्यात आपणं आपलं शरीर जास्तीत जास्त झाकून ठेवण असतो. घराचे खिडकी-दरवाजे बंद ठेवत असतो. त्यामुळे हिवाळ्यात डास कमी चावतात. तेच उन्हाळ्यात आपण कमी किंवा पातळ कपडे घालतो. काही लोक तर झोपताना कपडेही घालत नाहीत. खिडक्या-दरवाजे उघडे असतात. अशात डास घरात येतात आणि हल्ला करतात.

Web Title: Know how much human blood does a mosquito drink at one time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.