जगातला सगळ्यात मोठा ख्रिसमस ट्री, खासियत वाचून व्हाल अवाक्....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 03:32 PM2019-12-23T15:32:32+5:302019-12-23T15:36:53+5:30
प्लास्टिकच्या वापरामुळे अवघड गोष्टी सुद्धा सोप्या झाल्या आहेत. पण पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिकचा करण्यात आलेला वापर हा अनुकूल नसतो.
प्लास्टिकच्या वापरामुळे अवघड गोष्टी सुद्धा सोप्या झाल्या आहेत. पण पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिकचा करण्यात आलेला वापर हा अनुकूल नसतो. तर हे एक मोठे संकट आहे. प्लास्टिकच्या जास्त वापरामुळे मोठ्या प्रमाणावर तयार झालेला कचरा हा भारतातच नाही. तर संपूर्ण जगभरात आवाहन ठरला आहे. जगतल्या जवळजवळ सगळ्याच देशांचे सरकार प्लास्टीकचा वापर आणि त्यामुळे निर्माण होणारा कचरा रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
उत्तर लेबनान मधिल चेक्का या गावात १ लाख २० हजार प्लास्टिकच्या बाटल्यांपासून ख्रिसमस ट्री तयार करण्यात आला आहे. या ख्रिसमस ट्री ची उंची २८.५ मीटर इतकी आहे. या गावातल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन हा ख्रिसमस ट्रि तयार केला आहे. या भव्य ख्रिसमस ट्री ची नोंद गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड मध्ये घेण्यात येणार आहे. या प्रोजेक्टच्या प्रमुख कॅरोलिनी छेबिटिनी या आहेत. तसंच संपूर्ण जगाला प्लास्टिकपासून मुक्त ठेवण्यासाठी त्यांनी हा संदेश दिला आहे.
हा भव्य ख्रिसमस ट्री तयार करण्यासाठी ६ डिसेंबर पासून करण्यात आली होती. सोशल मिडियाच्या मदतीने या गावातील लोकांनी १ लाख २९ हजार प्लास्टीकच्या बाटल्या गोळा केल्या. फेकण्यापेक्षा या बॉटल्स आमच्याकडे जमा करा असा संदेश सोशल मिडियाच्या माध्यामातून देण्यात आला होता. या उपक्रमाला लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. या ख्रिसमस ट्री ला जवळपास दीड महीना लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आले आहे. यानंतर या बॉटल्सना रिसायकल केले जाणार आहे.
या आधी मॅक्सिकोमध्ये २०१८ साली बॉटल्सपासून ख्रिसमस ट्री तयार करण्याचा रेकॉर्ड करण्यात आला होता. त्यावेळी ख्रिसमस ट्रि तयार करण्यासाठी ९८ हजार बाटल्यांचा वापर करण्यात आला होता. पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यासाठी तसंच प्रदुषणमुक्तता करण्यासाठी हा प्रकल्प करण्यात आला होता.
या टीमचे सभासद असलेले अलेक्जेंडर असं सांगतात की, या उपक्रमात वापरण्यात आलेल्या बाटल्या रिसायकल केल्यानंतर त्यातून जे काही पैसे मिळतील त्या पैशांना हॉस्पिटलमध्ये डोनेट करण्यात येणार आहे. लेबनानासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण २०१५ मध्ये कचरा निवारणाची समस्या ही खूप मोठी झाली होती. प्रदुषणाचा स्तर वाढला होता. तसंच कॅन्सरच्या आजारात सुद्धा वाढ झाली होती.