बोंबला! पुरूषांच्या 'या' सवयीमुळे महिलांची वाढली डोकेदुखी, नको गं बाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 01:32 PM2019-12-30T13:32:14+5:302019-12-30T14:28:21+5:30

सध्याच्या काळात महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

know the men take more advantage of electricity in india | बोंबला! पुरूषांच्या 'या' सवयीमुळे महिलांची वाढली डोकेदुखी, नको गं बाई!

बोंबला! पुरूषांच्या 'या' सवयीमुळे महिलांची वाढली डोकेदुखी, नको गं बाई!

Next

(image credit-new england clean energy)

सध्याच्या काळात महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जसजस महागाई वाढत जाते तसंतसं महिन्याला मिळणारी मिळकत कमी वाटायला लागते. काहिही झालं तरी सगळ्या  जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतात . महिलांना खर्चाचं नियोजन पहावं लागतं. अशातच महिलांच्या घर खर्चात भर पाडण्यासाठी कारणीभूत असलेला एका घटकावर आधारीत रिसर्च समोर आला आहे. त्यानुसार तुमच्या घरातलं लाईटबील जास्त येण्यासाठी पुरूष कारणीभूत ठरतात. कारण या रिसर्चनुसार पंखा आणि टिव्ही पाहण्यासाठी  घरातील पुरूष विजेचा वापर करतात आणि त्यामुळे लाईटबिलाचा आकडा वाढतो. तसंच खर्चात भर पडते.

(image credit-feministing)

भारतात सगळ्यात जास्त इलेक्ट्रिसिटीचा वापर करण्यासाठी पुरूष पुढे असतात. तर महिला या पुरूषांच्या मागे आहेत.कार्नेगी मेलन यूनिवर्सिटीच्या रिसर्चनुसार ही धक्कादायक बाब समोर आली आहे. महिला या विजेचा सगळ्यात जास्त वापर कपडे प्रेस करण्यासाठी करतात. तर पुरूष विजेचा वापर टिव्ही पाहण्यासाठी करतात.

यूनिवर्सिटी के डेनियल अर्मानियोस आणि त्यांच्या सहकारी वर्गाने  ७ मोठ्या देशांमध्ये विजेच्या वापराबाबत संशोधन केले होते. यात  गुजरात, मध्यप्रदेश, बिहार, झारखंड, ओडिसा, यूपी  अजून काही राज्यांचा समावेश होता. जेव्हा हा रिसर्च गुजरातमध्ये करण्यात आला त्यावेळी ३० घरांमध्ये केला. त्यात असं निदर्शनास आलं की अर्ध्यापेक्षा जास्त घरांमध्ये किचन मध्ये विजेचा वापर कमी केला जात होता. तर त्या घरांमधील पुरूष टिव्ही आणि पंख्याचा वापर करतात.

 त्यानंतर इतर राज्यांमध्ये सर्वेक्षण केले त्यात असं दिसून आलं की वीज असल्यामुळे महिलांना सुरळीतपणे काम करता येतं. त्यामुळे त्या स्त्रिया जास्तीत जास्तवेळ घरातील काम आवरण्यात घालवतात. या रिसर्चमध्ये असं दिसून आलं की अनेक घरांमध्ये  महिलांपेक्षा जास्त पुरूष हे विजेचा वापर करतात. पंखा आणि बल्बचा वापर पुरूष जास्त करतात. 

Web Title: know the men take more advantage of electricity in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.