बापरे! आता आईस्क्रीम पण महागणार....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 04:36 PM2020-01-02T16:36:23+5:302020-01-02T16:48:15+5:30
कोणताही ऋतू असो आईस्क्रीम हे सगळ्यांनाच आवडत असतं.
कोणताही ऋतू असो आईस्क्रीम हे सगळ्यांनाच आवडत असतं. पार्टी असो किंवा घरात काही नवीन प्लॅन होत असेल तर आईस्क्रीम सगळे आवडीने खातात. पण दुधानंतर आता आईस्क्रीमची किंमत पण वाढणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. इनपुट कॉस्ट वाढल्यामुळे किंमत महागणार आहे. स्किम्ड मिल्क पावडरची किंमत वाढल्यामुळे आता आईस्क्रीमवर सुध्दा याचा परिणाम होणार आहे. सगळ्याच वस्तूंचे भाव वाढल्यामुळे या कंपन्यांनी आईस्क्रीमचे भाव वाढवले आहेत. आईस्क्रीम तसंच फ्रोजनफूडच्या दरात ही वाढ झालेली आहे.
हा निर्णय घेण्याशी संबंधीत असलेल्या कमिटीने असं सांगितले की गुजरातचे बेस्ट आईस्क्रीम तयार करणारी वाडीलाल ही कंपनी ८ ते १० रुपयांनी आपल्या कंपनीच्या आईस्कीमची किंमत वाढवणार आहे. अमूल सुध्दा आईस्क्रीमच्या दरात वाढ करण्याची शक्यता आहे.
मागच्या वर्षी मिल्क पावडरची किंमत वाढल्यामुळे हा परीणाम दिसून येत आहे. २०१९ ला याची किंमत ३३० रुपये प्रतिकिलो होती. तसंच त्याआधी २३० रुपये किलो हा भाव होता.
काही दिवसांपूर्वीच मदर डेअरी आणि अमूलने आपल्या दुधाच्या किमती २ ते ३ रुपयांनी वाढवल्या आहेत. जास्तकाळ चाललेला पावसाळा आणि वातावरणातील बदलाचा फटका वेगवेगळ्या राज्यांच्या दुध उत्पादकांना बसला आहे.
तसंच प्रतिकूल वातावरणामुळे पशूखादय सुद्धा महागले आहे. या सगळ्याचा परीणाम म्हणून आईस्क्रीम महागण्याची शक्यता आहे