भारतातील एक असं शेवटचं रेल्वे स्टेशन जिथे तिकीट काऊंटरही नाही, जाणून घ्या कुठे आहे हे स्टेशन...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 01:25 PM2023-01-02T13:25:37+5:302023-01-02T13:26:52+5:30

Last Railway Station Of India: भारतातील हे शेवटचं रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील हबीबपूर भागात आहे. हे स्टेशन इंग्रजांनी जसं सोडलं होतं, आजही तसंच आहे. हे भारतातील शेवटचं स्टेशन आहे.

Know the interesting facts about last railway station of India | भारतातील एक असं शेवटचं रेल्वे स्टेशन जिथे तिकीट काऊंटरही नाही, जाणून घ्या कुठे आहे हे स्टेशन...

भारतातील एक असं शेवटचं रेल्वे स्टेशन जिथे तिकीट काऊंटरही नाही, जाणून घ्या कुठे आहे हे स्टेशन...

Next

Last Railway Station Of India:  एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी भारतात रेल्वेचाच जास्त वापर केला जातो. कारण याने प्रवास सुखकर आणि स्वस्त असतो. तुम्हीही अनेकदा प्रवास केला असेल आणि अनेक स्टेशन फिरले असाल. पण कधीतरी तुमच्या मनात हा विचार आला असेलच की, असं एखादं रेल्वे स्टेशन असेल ज्याला देशातील शेवटचं स्टेशन म्हणता येईल. 

तर भारतात असं एक शेवटचं रेल्वे स्टेशन आहे. ज्यातील एक बिहारच्या अररिया जिल्ह्यात जोगबनी येथे आहे. या स्टेशनला देशातील शेवटचं स्टेशन मानलं जातं. इथून नेपाळमध्ये पायी जाता येतं. त्याशिवाय पश्चिम बंगालमधील सिंहाबाद रेल्वे स्टेशनही भारतातील शेवटचं रेल्वे स्टेशन मानलं जातं. या स्टेशनवरील प्रत्येक गोष्ट इंग्रजांच्या काळातील आहे.

भारतातील हे शेवटचं रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील हबीबपूर भागात आहे. हे स्टेशन इंग्रजांनी जसं सोडलं होतं, आजही तसंच आहे. हे भारतातील शेवटचं स्टेशन आहे. जे बांग्लादेशच्या सीमेजवळ आहे. बांग्लादेशच्या जवळ असल्याने इथून तिकडे पायी जाता येतं.
भारताची फाळणी झाल्यानंतर या स्टेशनच्या मेंटनन्सचं काम जसंच्या तसं थांबवण्यात आलं होतं. त्यामुळे इथून कोणतीही गाडी जात नव्हती. पण 1978 मध्ये जेव्हा मालगाड्या सुरू झाल्या तेव्हा पुन्हा रेल्वे आणि हार्नचा आवाज येऊ लागला. या गाड्या आधी बांग्लादेशपर्यंत जात होत्या. पण 2011 मध्ये शेजारी नेपाळपर्यंतही जात होत्या.

भलेही इथून गाड्यांची ये-जा सुरू झाली असेल, पण या स्टेशनच्या रंग-रूपात काहीच बदल झाला नाही. हे स्टेशन आजही जसंच्या तसंच आहे, जसं इंग्रज सोडून गेले होते. इथून मालगाडीशिवाय दोन मैत्री एक्सप्रेस पॅसेंजर रेल्वेही जातात.

या स्टेशनचा वापर कोलकाता आणि ढाका दरम्यान रेल्वे कनेक्टिविटीसाठी केला जात होता. पण ही रेल्वे स्वातंत्र्य आधीची आहे. त्यामुळे ढाका येथे जाण्यासाठी महात्मा गांधी आणि सुभाष चंद्र बोस यांनी अनेकदा या मार्गाचा वापर केला होता. कधीकाळी इथून दार्जिलिंग मेल सारख्या गाड्याही जात होत्या. पण आता इथून केवळ मालगाड्या जातात.

या स्टेशनवर आजही जुन्या काळातील हाताच्या गिअरच्या सिग्नचा वापर केला जातो. सोबतच इथे जास्त रेल्वे कर्मचारीही ठेवले जात नाहीत.
इतकंच नाही तर टिकीट काउंटरही बंद झालं आहे. जास्त कर्मचारी नसतात कारण जेव्हा मालगाडी जाते तेव्हा फक्त सिग्नल द्यायचा असतो. जी रोहनपूर मार्गे बांग्लादेशला जाते.

Web Title: Know the interesting facts about last railway station of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.