भारतातील या गुहेमध्ये आहे सोन्याचा भांडार? पण दरवाजा कुणीच उघडू शकलं नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 12:41 PM2023-05-12T12:41:32+5:302023-05-12T12:47:02+5:30
Son Bhandar : या गुहेमध्ये खजिना लपवल्याचे अनेक किस्से सांगितले जातात. या गुहेत कोट्यावधी रूपयांचा खजिना लपवला आहे. पण आजपर्यंत एकही मनुष्य या खजिन्यापर्यंत पोहोचू शकला नाही.
Son Bhandar : जगभरात अशा अनेक गुहा आहेत ज्यांच्या रहस्यांबाबत आजही संशोधकांना काही कळू शकलेलं नाही. या गुहा आजही रहस्य बनून आहेत. भारतातही अशा गुहा आहेत. ज्यातील गुहेबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या गुहेमध्ये खजिना लपवल्याचे अनेक किस्से सांगितले जातात. या गुहेत कोट्यावधी रूपयांचा खजिना लपवला आहे. पण आजपर्यंत एकही मनुष्य या खजिन्यापर्यंत पोहोचू शकला नाही.
काही रिपोर्ट्सनुसार, बिहारच्या राजगीरमध्ये दोन आर्टिफिशिअल गुहा आहेत. एक गुहेबाहेर मौर्यकालीन कलाकृती सापडल्या आहेत. तेच दुसऱ्या गुहेच्या प्रवेशद्वारावर गुप्त राजवंशाच्या भाषेत किंवा चिन्हामध्ये काही शिलालेख सापडले आहेत.
रिपोर्टनुसार, या गुहांची निर्मिती जैन मुनींनी केली होती. या गुहांचं निर्माण चार शताब्दी इ.पू सांगितलं जातं. तेच एका गुहेबाहेर विष्णुची मूर्ती आणि जैन कलाकृती बघायला मिळतात.
काही संशोधकांनी या गुहांचा अभ्यासही केला. तर निष्कर्ष असा निघाला की, या गुहांचा संबंध बौद्ध धर्माशी आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या गुहांना सोन्याचा भांडार म्हटलं जातं. हे आताच नाही तर फार पूर्वीपासून तशी चर्चा होत आहे. आता या गुहांना सोन्याचा भांडार म्हटलं जातं असा प्रश्न तुम्हाला पडणं शक्य आहे.
काही कथांनुसार असे सांगितले जाते की, या गुहांच्या आत सोनं भरलेलं आहे. या सोन्याच्या खजिन्यापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहे. पण आजपर्यंत त्या मार्गापर्यंत कुणी पोहोचू शकलं नाही. काही लोकांचं असंही मत आहे की, इथे जरासंध किंवा बिंबिसारचा खजिना लपवलेला आहे.
कारण गुहांपासून काही अंतरावर तुरूंग आहे जिथे अजातशत्रूने आपले वडील बिंबिसारला बंदी बनवलं होतं. इतकंच नाही तर गुहेच्या भींतीवर काही गुप्त शिलालेखही आहेत. जे आजपर्यंत कुणी वाचू शकले नाहीत.
लोकांचा असा समज आहे की, जे लोक हे वाचू शकतील त्यांना खजिन्याचा मार्ग सापडेल. पण आजपर्यंत असं झालेलं नाही. अनेक लोकांनी आत जाऊन खजिना शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश मिळालं नाही. इंग्रजांनी तर तोफगोळ्यांनी गुहेची भींत तोडण्याचा प्रयत्न केला. पण तेही जमलं नाही. त्यामुळे या गुहेचं रहस्य आजही रहस्य बनूनच आहे.