प्लास्टिकच्या ग्लासवर लाइन्स का बनलेल्या असतात? जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 12:00 PM2023-07-15T12:00:25+5:302023-07-15T12:02:33+5:30
Why lines on plastic cup : सध्या ट्विटरवर एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यात प्लास्टिक कपवरील लाइनचं कारण सांगण्यात आलं आहे. प्लास्टिकच्या कप्सवर दोन तीन लाइन दिसून येतात.
Why lines on plastic cup : प्लास्टिकचे कप फारच कामाचे असतात. त्यांचा वापर वेगवेगळ्या कामांसाठी केला जातो. खासकरून पार्ट्यांमध्ये यांचा अधिक वापर होतो. पण या कपांबाबत तुम्हाला एक गोष्ट माहीत नसेल. तुम्ही प्लास्टिकच्या कप्सवर लाइन्स बनलेल्या पाहिल्या असतील. पण या लाइन्स का असतात याचा विचार केलाय का? नसेल केला तर याचं उत्तर आज आम्ही सांगणार आहोत.
सध्या ट्विटरवर एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यात प्लास्टिक कपवरील लाइनचं कारण सांगण्यात आलं आहे. प्लास्टिकच्या कप्सवर दोन तीन लाइन दिसून येतात. ट्विटर अकाउंट @todayyearsoldig वर ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यात सांगण्यात आलं आहे की, सोलो कप्सच्या वर ज्या लाइन बनलेल्या असतात त्या मुळात पदार्थाना मोजण्याच्या कामात येतात. या कप्सना सोलो कप्स असं म्हणतात.
Learn something new every day pic.twitter.com/G5TlrDm0Ql
— Today Years Old (@todayyearsoldig) July 8, 2023
या फोटोत सांगण्यात आलं आहे की, ज्या लाइन्स असतात त्या मोजण्यासाठी म्हणजे मापासाठी असतात. सगळ्यात खालील लाइन 1 आउंसची आहे. त्या लाइनवर लिकर म्हणजे दारू भरली जाते. त्यानंतरची लाइन 5 आउंसची आहे. त्या पॉइंटपर्यंत वाइन भरली जाते. त्यावरची लाइन 12 आउंसची आहे आणि त्या लाइनपर्यंत बीअर भरली जाते. बीअर जास्त वरपर्यंत भरण्याचं कारण म्हणजे ती ग्लासमध्ये टाकल्यावर त्यात फेस तयार होतो. जो वरपर्यंत पोहोचतो.
या पोस्टला 3 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक म्हणाला की, सगळ्यात वरची लाइन पाण्यासाठी असते ज्याने व्यक्ती हायड्रेट रहावा. तर एक जण म्हणाला की, सगळ्यात वरच्या लाइनपर्यंत तो रम भरून पितो. काही लोकांचं मत आहे की, या लाइन्स ग्लास नीट पकडता यावा म्हणून असतात.