पेन्शनधारकांना आधार कार्डवर मिळतात तीन मोठे फायदे! 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 10:25 AM2022-08-27T10:25:27+5:302022-08-27T10:28:02+5:30

Aadhar Card Benefit : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) लोकांच्या सोयीसाठी आधारचे इतर प्रकारही विकसित केले आहेत.

Know What Are The Main Benefits Pensioners Get On Aadhar Card | पेन्शनधारकांना आधार कार्डवर मिळतात तीन मोठे फायदे! 

पेन्शनधारकांना आधार कार्डवर मिळतात तीन मोठे फायदे! 

Next

नवी दिल्ली : आधार नंबर हा UIDAI द्वारे जारी केलेला 12 अंकाचा एक नंबर आहे. UIDAI वेबसाइटनुसार, "ओळख पुरावा म्हणून आधारचा वापर लाभार्थ्यांना त्यांची ओळख सिद्ध करण्यासाठी एकापेक्षा जास्त कागदपत्रे सादर करण्याची गरज दूर करण्याची सुविधा देते."

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या लेटेस्ट ट्विटनुसार, "आधार कार्डच्या सुविधेमुळे, पीएफ आणि पेन्शन थेट पेन्शनधारकांच्या खात्यात हस्तांतरित केले जाऊ शकते आणि लाभार्थ्यांना बँकेत प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचा त्रास न होता त्यांचे पेन्शन मिळत राहते." अशा परिस्थितीत पेन्शनधारकांसाठी आधार कार्डचे काय फायदे आहेत, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

सुलभ पीएफ वितरण : तुमचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खाते आधारशी लिंक करून क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया वेगवान केली जाऊ शकते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) या दिशेने अनेक पावले उचलली आहेत. EPFO पोर्टलनुसार, "जर तुम्हाला EPF ऑनलाइन क्लेम करायचा असेल, तर तुम्हाला तुमचा UAN अनिवार्यपणे आधारशी लिंक करावा लागेल."

वेळेवर पेमेंट : हे अनिवार्य नसले तरी, तुमचा आधार पेन्शन खात्याशी लिंक केल्याने सरकारी अधिकाऱ्यांना तुमच्या सर्व तपशीलांची पडताळणी करणे सोपे होईल. तुमचे आधार कार्ड ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पेन्शन खात्याशी लिंक केले जाऊ शकते.

इन्स्टंट डिजिटल लाइफ सर्टिफिकेट: दरवर्षी पेन्शनधारकांना त्यांचे पेन्शन मिळवण्यासाठी पेन्शन वितरण प्राधिकरणाकडे जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. मात्र, आधार आधारित जीवन प्रमाण सेवा आता डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (DLC) ऑनलाइन सबमिशन करण्यात मदत करते. ही डिजिटल सेवा राज्य आणि केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी आहे, जी बायोमेट्रिकद्वारे देखील चालविली जाते.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) लोकांच्या सोयीसाठी आधारचे इतर प्रकारही विकसित केले आहेत. प्राधिकरणाचे म्हणणे आहे की त्यांनी जारी केलेले आधारचे सर्व प्रकार समान प्रमाणात वैध आहेत. UIDAI वेबसाइटनुसार, आधारचे हे वेगवेगळे स्वरूप म्हणजे आधार पत्र, ई-आधार, mAadhaar, PVC कार्ड. एवढेच नाही तर UIDAI ने जाहीर केले आहे की आता तुमचे आधार कार्ड कोणत्याही नोंदणीकृत मोबाईल नंबरशिवाय डाउनलोड करता येणार आहे. ज्यांनी आपला मोबाईल क्रमांक नोंदविला नाही त्यांच्या मदतीसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Web Title: Know What Are The Main Benefits Pensioners Get On Aadhar Card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.