कोणत्या वस्तूपासून तयार केली जाते काच? तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 12:40 PM2021-11-23T12:40:55+5:302021-11-23T12:41:54+5:30
काच कोणत्या वस्तूपासून तयार केली जाते. आज तुम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत. तुम्हीही याबाबत वाचून अवाक् व्हाल.
आपल्या आजूबाजूला काचेच्या अनेक वस्तू असतात. घरातील काचेच्या काहीना काही वस्तू असतातच. जवळपास सर्वांच्याच दिवसाची सुरूवात काचेच्या आरशात बघूनच होते. पण अनेकांना हे माहीत नाही की, काच कोणत्या वस्तूपासून तयार केली जाते. आज तुम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत. तुम्हीही याबाबत वाचून अवाक् व्हाल. काच तयार करण्याची प्रोसेस फार अवघड आहे. त्यासाठी अनेक टप्पे असतात. चला जाणून घेऊ ही प्रोसेस....
कोणत्या वस्तूपासून तयार केली जाते काच?
काच रेतीपासून तयार केली जाते. होय, हे सत्य आहे. पण काच तयार करण्यासाठी सामान्य रेतीचा वापर होत नाही. काच अशा रेतीापासून तयार केली जाते ज्यात सिलिकाचं प्रमाण ९९ टक्के असतं.
काय असते प्रोसेस?
काच तयार करण्यासाठी सर्वातआधी ७५ टक्के रेती, १५ टक्के सोडा अॅश आणि १० टक्के चूना मिश्रित केला जातो. या मिश्रणात रिसायकल करण्यासाठी काचेचे तुकडेही मिश्रित केले जातात. मग हे मिश्रण भट्टीत ८०० ते १५०० डिग्री सेल्सिअस गरम करून वितळवलं जातं. हे मिश्रण वितळल्यानंतर एका समतोल प्लॅटफॉर्मवर टाकलं जातं. त्यानंतर हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर एका समतोल पारदर्शी काचेच्या रूपात तयार होतं.
कुणी लावला होता शोध?
काचेच्या अनेक वस्तू तुम्ही आजपर्यंत वापरल्या असतील. पण कधी विचारही केला नसेल की, काच तयार करण्यासाठी रेतीचा वापर केला जात असेल. आधुनिक काचेचा आविष्कार जर्मन वैज्ञानिक जस्टस वॉन लिबिगने १८३५ मध्ये केला होता. काचा तीन प्रकारच्या असतात पारदर्शी काच, अपारदर्शी काच आणि अल्प पारदर्शी काच.