Ambulance वर समोर उलटं का लिहिलेलं असतं नाव? तुम्हाला माहीत आहे का कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 02:00 PM2022-06-20T14:00:40+5:302022-06-20T14:02:16+5:30

Ambulance च्या सायरननेच लोक सतर्क होतात. भरपूर ट्रॅफिक असेल तरीही लोक Ambulance च्या सायरनचा आवाज ऐकून रस्ता मोकळा करतात. पांढऱ्या रंगाची Ambulance तुम्ही अनेकदा पाहिली असेल.

Know why ambulance name written reverse on vehicle | Ambulance वर समोर उलटं का लिहिलेलं असतं नाव? तुम्हाला माहीत आहे का कारण...

Ambulance वर समोर उलटं का लिहिलेलं असतं नाव? तुम्हाला माहीत आहे का कारण...

googlenewsNext

कोणत्याही रूग्णाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी हॉस्पिटल Ambulance Service देतं. जर हॉस्पिटलकडे Ambulance नसेल तर अनेक प्रायव्हेट संस्थाही याची सुविधा देतात. जर एखाद्या सीरिअस रूग्णाला यातून नेलं जात असेल तर यातच काही सुविधा असतात. त्यांना Ambulance मधेच सलाइन किंवा उपचार दिले जातात. Ambulance चा सायरन ऐकून लोकही गाडी बाजूला घेऊन तिला साइड देतात.

Ambulance च्या सायरननेच लोक सतर्क होतात. भरपूर ट्रॅफिक असेल तरीही लोक Ambulance च्या सायरनचा आवाज ऐकून रस्ता मोकळा करतात. पांढऱ्या रंगाची Ambulance तुम्ही अनेकदा पाहिली असेल. पण तुम्ही कधी नोटीस केलं का की, गाडीच्या समोरच्या भागात लिहिलेला Ambulance हा शब्द उलटा का लिहिलेला असतो? हा शब्द समोर ECNALUBMA असं  लिहिलेला असतो. पण याचं कारण काय आहे? काही लोकांना याचा अर्थ माहितही असेल. पण काहींना नसेल. 

Ambulance मधून अनेकदा सीरिअस रूग्णांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेलं जातं. जेणेकरून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊन वेळीच उपचार करता यावे. त्यामुळे Ambulance चा सायरनही मोठ्या आवाजात वाजवला जातो. पण असा सायरन तर पोलिसांच्या गाडीलाही असतो. याच कारणाने Ambulance च्या समोरच्या भागावर Ambulance हा शब्द उलटा लिहिलेला असतो. यामुळे समोरच्या गाडीच्या साइड मिररमध्ये Ambulance हा शब्द सरळ दिसतो. याने समोरची गाडी लगेच Ambulance साठी रस्ता देते.

आजच्या काळात Ambulance चं महत्व फार वाढलं आहे. अवयव प्रत्यारोपणच्या केसेस आणि एखाद्या मोठ्या दुर्घटनेच्या स्थितीत ट्रॅफिक पोलिसांकडून Ambulance ला ग्रीन कॉरीडोर प्रदान केला जातो. जेणेकरून Ambulance कुठे अडकू नये आणि ती वेळेच हॉस्पिटलला पोहोचावी. अलिकडे तर रूग्ण वेळेवर हॉस्पिटलला पोहोचावे म्हणून हवाई Ambulance चाही वापर वाढला आहे.

Web Title: Know why ambulance name written reverse on vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.