अखेर Bacardi च्या लोगोमध्ये वटवाघुळाचं चित्र का असतं? वाचा मागचं रहस्यमय कारण....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 02:21 PM2021-04-26T14:21:31+5:302021-04-26T14:24:43+5:30

जर तुम्ही कधी बकार्डीची बॉटल पाहिली असेल तर लक्ष दिलं असेल की, या बॉटलवर एक उडणारं वटवाघुळाचं चित्र दाखवण्यात आलं आहे.

Know why Bacardi has a bat in its logo | अखेर Bacardi च्या लोगोमध्ये वटवाघुळाचं चित्र का असतं? वाचा मागचं रहस्यमय कारण....

अखेर Bacardi च्या लोगोमध्ये वटवाघुळाचं चित्र का असतं? वाचा मागचं रहस्यमय कारण....

Next

जगभरात बकार्डी पिणाऱ्यांची संख्या कमी नाही. भारतातही या रमचे अनेक शौकीन आहेत. हा ब्रॅन्ड येऊन आता १६० वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे. दरवर्षी याची डिमांडही वाढत आहे. बकार्डीची एक गोष्ट लोकांना नेहमीच प्रश्नात पाडते. ती म्हणजे याचा लोगो.

जर तुम्ही कधी बकार्डीची बॉटल पाहिली असेल तर लक्ष दिलं असेल की, या बॉटलवर एक उडणारं वटवाघुळाचं चित्र दाखवण्यात आलं आहे. तुम्हाला कधी प्रश्न पडला का की, या लोगोचा अर्थ काय आहे? तुम्हाला असा प्रश्न पडला असेल तर आम्ही तुम्हाला याचं उत्तर देणार आहोत.

काय आहे बकार्डीचा इतिहास?

बकार्डीची स्थापना १८६२ मध्ये Facundo Bacardi ने केली होती. त्यान क्यूबामध्ये आपली पहिली डिस्टिलरी स्थापित केली होती. पण इथे एक रोमांचक घटना घडली. डिस्टिलरीमध्ये काही अनोळखी पाहुणे आले होते. हे पाहुणे होते वटवाघुळं.

Facundo Bacardi ची पत्नी Amalia Bacardi ची नजर छतावर गेली तेव्हा तिने पाहिले की, बरीच वटवाघुळं तिथे बसले आहेत. ही वटवाघळं कदाचित कशाच्या सुगंधाने तिथे पोहोचले असतील. त्यांनी वटवाघुळांना डिस्टिलरीच्या छतावरून पळवण्याऐवजी त्यांना आपला लोगो बनवण्याचा विचार केला. पण यामागेही एक रहस्यमय गोष्ट आहे.

वटवाघळांना लोगो करण्याचं कारण?

हा निर्णय असाच घेण्यात आला नाही. यामागे इतरही अनेक कारणे होती. वटवाघळांना रमच्या व्यवसायाचा स्वाभाविक मित्र मानलं जातं. कारण ते उसाच्या शेतीची रक्षा करतात आणि ऊसाला नुकसान करणारे कीटक ते खातात.दुसरं म्हणजे लॅटीन कल्चरमध्ये वटवाघळांना चांगल्या भविष्याचा संकेत मानलं जातं. हेच कारण होतं की, त्यांनी याचाच लोगो करण्याचा निर्णय घेतला.

Facundo Bacardi आणि त्याचा पत्नीचा हा निर्णय योग्य ठरला. त्याकाळी क्यूबात लोक फार जास्त शिकलेले नव्हते. त्यामुळे त्यांच्यासाठी बकार्डी शब्दाचं फार महत्व नव्हतं. मात्र, बॉटलवरील वटवाघळाच्या चित्राने त्यांना याकडे आकर्षित केलं होतं. याने त्यांना या ब्रॅन्डला लक्षात ठेवण्यासही मदत मिळाली. 

१६० वर्षाच्या प्रवासात बकार्डीच्या लोगोमध्ये छोटे मोठे काही बदल झाले. पण त्यांची मुख्य ओळख वटवाघुळ आजही तशीच आहे. रिपोर्टनुसार, आज बकार्डीच्या वर्षभरात २० कोटीपेक्षा जास्त बॉटल्स विकल्या जातात. 
 

Web Title: Know why Bacardi has a bat in its logo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.