मंदिरात प्रवेश करताना का वाजवली जाते घंटी? जाणून घ्या वैज्ञानिक कारण....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 04:12 PM2023-01-17T16:12:35+5:302023-01-17T16:23:43+5:30
अनेकजण नेहमी मंदिरात जाऊ ही घंटी वाजवत असतील, पण यामागे काय कारण असावं असा प्रश्न नक्कीच काही लोकांना पडला असेल. चला जाणून घेऊ कारण...
असे म्हणतात की, देवाजी पूजा करताना घंटी वाजवली पाहिजे. कारण घंटी वाजवल्याने देव जागा होतो आणि भक्तांची प्रार्थना ऐकतो. पण याचं इतकंच एक कारण नाहीये. याला काही वैज्ञानिक कारणंही असल्याची माहिती आहे. त्या कारणामुळेच घंटी नेहमी मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावली जाते. अनेकजण नेहमी मंदिरात जाऊ ही घंटी वाजवत असतील, पण यामागे काय कारण असावं असा प्रश्न नक्कीच काही लोकांना पडला असेल. चला जाणून घेऊ कारण...
वैज्ञानिक कारण
मंदिर घरातील असो वा धार्मिक स्थळावरील तिथे घंटी असतेच. यामागे धार्मिक कारण तर आहेच सोबतच यांचं वैज्ञानिक कारणही आहे. अभ्यासकांचं म्हणनं आहे की, जेव्हा घंटी वाजवली जाते तेव्हा वातावरणात एक कंपन निर्माण होतं. हे कंपण जवळपास पुढील 10 सेकंदासाठी ऐकायला मिळतं.
असे सांगितले जाते की, या कंपनाच्या आवाजामुळे तुमच्या शरीरातील काही इंद्रिये जागी होतात. तसेच या आवाजामुळे तुमच्या डोक्यातील नकारात्मक विचार दूर होतात. यामुळे तुम्ही अधिक लक्ष केंद्रीत करुन स्वच्छ मनाने मंदिरात प्रवेश मिळवता.
हेही होतात फायदे....
यासोबतच घंटीच्या आवाजामुळे आजूबाजूचे जीवाणू, विषाणू आणि सूक्ष्म जीव दूर होतात. याने वातावरण शुद्ध राहतं. हेच कारण सांगितलं जातं की, ज्या जागांवर नियमीत घंटीचा आवाज येत राहतो तेथील वातावरण पवित्र राहतं.
घंटीच्या मनमोहक आवाजात व्यक्तीला आध्यात्माकडे ओढून नेण्याची क्षमता आहे. मन घंटीच्या आवाजाशी एकरुप होऊन शांततेचा अनुभव घेतं. डोक्यातील नकारात्मक विचार दूर होऊन भक्त आणखी एकाग्रतेने भक्ती करु शकतात.