कुत्रा झोपण्यापूर्वी एकाच जागी गोलगोल चक्कर का मारतो? जाणून घ्या यामागचं कारण....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 04:59 PM2023-01-25T16:59:30+5:302023-01-25T17:11:19+5:30

Dog : तुम्ही जसं कुत्र्यांना शिकवाल ते तसं करणार. काही दिवसातच कुत्रे फार समजदार होतात. त्यांची शिकण्याची क्षमता फार जास्त आहे. तेव्हाच ते तुमच्या इशाऱ्यावर काहीही काम करतात.

Know why dog turn around while sitting or sleeping | कुत्रा झोपण्यापूर्वी एकाच जागी गोलगोल चक्कर का मारतो? जाणून घ्या यामागचं कारण....

कुत्रा झोपण्यापूर्वी एकाच जागी गोलगोल चक्कर का मारतो? जाणून घ्या यामागचं कारण....

Next

Dog : असे म्हणतात की कुत्रा हा मनुष्यांपेक्षा जास्त इमानदार प्राणी आहे. तसेच ते आपल्या मालकांना कधीच दगा देत नाहीत हा त्यांचा एक खास गुण आहे. कुत्र्यांपेक्षा इमानदार दुसरा प्राणी नाही त्यामुळेच पाळीव प्राण्यांमध्ये त्यांचा वरचा क्रमांक लागतो. 

तुम्ही जसं कुत्र्यांना शिकवाल ते तसं करणार. काही दिवसातच कुत्रे फार समजदार होतात. त्यांची शिकण्याची क्षमता फार जास्त आहे. तेव्हाच ते तुमच्या इशाऱ्यावर काहीही काम करतात. पण कुत्र्यांचे आणखीही अशी रहस्य आहेत जी तुम्हाला माहीत नसणार. जर तुम्हाला कुणी विचारलं की, बसताना किंवा झोपताना त्या जागेवर कुत्रे गोल चक्कर का मारतात? तर याचं क्वचितच कुणाकडे उत्तर असेल. चला आज या रहस्याबाबत आम्ही तुम्हाला सांगतो.

जेव्हा मनुष्याला कशाप्रकारच्या वाईट घटनेचा सामना करावा लागतो तेव्हा कुत्री रडतात. कुत्रे दिवसा आकाशाकडे तोडं करून भूंकतात तेव्हा त्यांचं असं करणं मानवासाठी अशुभ मानलं जातं. अनेक लोक त्यावेळी कोणतंही काम करत नाहीत. 

तसेच अशी मान्यता आहे की, कुत्रा जेव्हा तुमची चप्पल किंवा शूज घेऊन पळतो याचा अर्थ आर्थिक नुकसान होणार आहे. यावर काही लोकांचा विश्वास असतो तर काही लोकांचा नसतो. काळानुसार कुत्रे मानवी जीवनाचा आणि परिवाराचा भाग बनतात.

कुत्रे हे पूर्वी जंगली प्राणी होते. नंतर लोकांनी आपल्या सोयीसाठी त्यांना पाळीव केलं. लोकांच्या वस्तीत राहून त्यांच्या काही सवयी नक्कीच बदलल्या. पण जंगलातील पूर्वजांकडून मिळालेल्या काही सवयी मात्र तशाच राहिल्या. गोल चक्कर मारणे ही त्यातलीच एक सवय.

एका ठिकाणी गोल चक्कर मारून झोपण्याची किंवा बसण्याची सवय त्यांना पूर्वजांकडून मिळाली आहे. ज्या ठिकाणी बसायचं किंवा झोपायचं आहे त्या ठिकाणी साप किंवा कीटक नाही ना, ती जागा बसण्यायोग्य आहे ना, काटे तर नाही ना हे चेक करण्यासाठी कुत्रे जागेवर गोल चक्कर मारतात. असं करून ते सापांना घाबरवतात सुद्धा. 

तसेच कुत्रे ज्या जागेवर झोपणार आहेत किंवा बसणार आहेत ती जागा ते थोडी उकरून काढतात. यामागचं कारण म्हणजे ती जागाही व्यवस्थित बसण्याजोगी होते आणि त्यांना जरा उबही मिळते. तर असं आहे कुत्रा गोल चक्कर मारू बसण्यामागचं कारण....

Web Title: Know why dog turn around while sitting or sleeping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.