याला म्हणतात नशीब! 'या' गावातील प्रत्येक कुटुंबाला मिळाले 58 लाख; रातोरात झाले लखपती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 03:34 PM2023-07-09T15:34:17+5:302023-07-09T15:35:07+5:30

गावात राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला 58-58 लाख रुपये देण्याची मोठी घोषणा केली.

korean billionaire gave millions in cash to home villagers | याला म्हणतात नशीब! 'या' गावातील प्रत्येक कुटुंबाला मिळाले 58 लाख; रातोरात झाले लखपती

याला म्हणतात नशीब! 'या' गावातील प्रत्येक कुटुंबाला मिळाले 58 लाख; रातोरात झाले लखपती

googlenewsNext

कोणाचं नशीब कधी आणि कसं फळफळेल हे सांगता येत नाही. अशीच एक घटना आता समोर आली आहे. दक्षिण कोरियातील एका बिझनेसमनचा दानशूरपणा पाहायला मिळाला आहे. त्याचा दानशूरपणा पाहून गावातील सर्वच जण आश्चर्यचकित झाले आहेत. गावात राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला 58-58 लाख रुपये देण्याची मोठी घोषणा त्याने केली. या घोषणेने गावातील लोक रातोरात श्रीमंत झाले आणि त्यांचं नशीब फळफळलं.

दक्षिण कोरियातील बिझनेसमन ली जोंग क्यूनने घोषणा केली आहे. ज्या गावात त्याचे बालपण गेले त्या गावातील प्रत्येक घराला 58 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सनुसार, ली जोंग क्यूनन हे प्रॉपर्टी डेव्हलपर ग्रुपचे संस्थापक आहेत. तो दक्षिण कोरियात राहतो. काही वेळापूर्वीच त्याने सनचिओन शहरातील एका छोट्या गावासाठी ही घोषणा केली होती. हे तेच गाव आहे जिथे त्याचे बालपण गेले होते.

प्रत्येक घराला 58 लाख रुपये देण्याची घोषणा 

आपल्या गावातील लोकांना 58 लाख रुपये देणार असल्याची घोषणा केली. त्याच्या गावात 280 हून अधिक कुटुंबं राहत असल्याचं सांगण्यात येत आहे. जोंग यांनी या सर्व कुटुंबांसाठी 58-58 लाख रुपयांची मदत केली आहे. याशिवाय त्याने आपल्या शाळेतील मित्रांनाही मोठमोठ्या भेटवस्तू दिल्या आहेत. त्यानुसार जोंग यांनी 1500 कोटींहून अधिक दान म्हणून दिलं आहे. त्याच्या या दानशूरपणाचं लोक कौतुक करत आहेत.

गरिबीत गावकऱ्यांनी केलेली मदत 

रिपोर्टनुसार, उद्योगपती ली जोंग क्युन यांची एकूण संपत्ती सुमारे 1.5 लाख कोटी रुपये आहे. दक्षिण कोरियाच्या श्रीमंतांमध्ये त्याचा समावेश होतो. त्याचे बालपण अत्यंत गरिबीत गेले आणि सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने आर्थिक संकट होतं. गावातील लोकांनी त्यांना खूप मदत केली होती. मग तो गाव सोडून शहरात आला आणि बिझनेस सुरू केला व यशस्वी झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: korean billionaire gave millions in cash to home villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.