नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 12:46 PM2021-04-26T12:46:50+5:302021-04-26T13:45:10+5:30
labourer become crorepati : ३८ वर्षीय बोधराज महिन्याला फक्त १०,००० रूपये कमावून आपलं घर चालवायचा. परंतु त्यांचे नशीब रातोरात बदलले आणि करोडपती झाला.
भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है, हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. अशीच एक घटना दिल्लीतील पठाणकोटमधून समोर आली आहे. रोज मजूरी करून आपल्या कुटुंबाचं पोट भरत असलेल्या एका गरीब कुटुंबातील माणसाला चक्क १ कोटींची लॉटरी लागलीआहे.
लॉटरीचं तिकिट विकत घेण्याची सवय अनेकांना असते. पण नशिबात असेल तरच बक्षिस मिळतं, नाहीतर पैसे वाया. तुमचा विश्वास बसणार नाही पण १ कोटीची लॉटरी जिंकणाऱ्या या माणसानं आयुष्यात पहिल्यांदाच लॉटरीचं तिकिट विकत घेतलं होतं. १०० रूपयांच्या एका तिकिटानं या माणसाला करोडपती बनवलं.
अकोटा गावचा रहिवासी असलेला ३८ वर्षीय बोधराज महिन्याला फक्त १०,००० रूपये कमावून आपलं घर चालवायचा. परंतु त्यांचे नशीब रातोरात बदलले आणि करोडपती झाला. नशिबाने त्याच्यावर खूप प्रेम केले आहे यावर अजूनही तो विश्वास ठेवू शकत नाही. पंजाब स्टेट डियर १०० साप्ताहिक लॉटरीमध्ये त्याला पहिले पारितोषिक मिळाले आहे, ज्याची किंमत १ कोटी आहे.
बोधराजला आपल्या दोन मुलींच्या चांगल्या भविष्यासाठी १ कोटी रुपये बक्षीस रक्कम खर्च करायची आहे. त्यांना आपल्या मुलींना चांगले शिक्षण द्यायचे आहे जेणेकरुन भविष्यात काहीतरी चांगले करता येईल. सरकारच्या लॉटरी विभागाने बोधराजची सर्व कागदपत्रे जमा केली आहेत, लवकरच जिंकलेली रक्कम बोधराजच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल. आधी बघण्याचा कार्यक्रम, साखरपूडाही केला; नंतर म्हणतो मुलीच्या डोळ्यात दोष, मुलीकडच्यांनी चोप चोप चोपला
मित्राच्या सांगण्यावरून लॉटरी विकत घेतली
बोधराजने सांगितले की, ''माझा मित्र पठाणकोट येथे पंजाब राज्य बैसाखी बंपर लॉटरीचे तिकिट खरेदी करण्यासाठी गेला होता, त्याने मला लॉटरी खरेदी करण्यास सांगितले. मला माझे पैसे लॉटरीवर उडवायचे नव्हते. तरीही मी १०० रुपयांची लॉटरी खरेदी केली. पण मला माहित नव्हते की नशिब माझ्यासाठी इतका मोठा मार्ग उघडेल.'' बोंबला! स्विमिंग पूलमध्ये अनोखळी मुलीशी बोलायला गेला; पत्नीनं पाहताचं केलं असं काही, पाहा व्हिडीओ