बॉस करायला लावायचा 'ओव्हरटाइम'; महिलेने असं काही केलं की.. घडवली जन्माची अद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 06:03 PM2023-05-29T18:03:49+5:302023-05-29T18:05:53+5:30
प्रत्येक ऑफिसचे नियम वेगवेगळे असतात, पण कधीकधी असेही प्रसंग येतात की कर्मचाऱ्याचा संयम संपतो.
Boss Employee Trending Story: जगभरातील अनेक देशांमध्ये सरकारी आणि खाजगी कंपन्यांसाठी वेगवेगळे नियम आहेत. काही ठिकाणी तर असे आहे की आठवड्यातून केवळ तीन-चार दिवस कामाचे असतात. तर काही ठिकाणी आठवड्यात एकही दिवस नीटसा आराम मिळत नाही. परंतु या सर्वांमध्ये कधी-कधी असे प्रसंगही येतात, की कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण खूपच वाढतो. मग त्याचा परिणाम कामावर आणि पर्यायाने शरीरावर होतो. अलीकडेच एका महिलेने या संबंधीचा एक प्रसंग सांगितला. तिचा बॉस तिला ओव्हरटाइम करायला लावत होता. तिने बॉसला अशी अद्दल घडवली की तो जन्मभर लक्षात ठेवेल.
महिलेने असं केलं तरी काय..?
मिररच्या रिपोर्टनुसार, युरोपमधील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेने आपल्यासोबत झालेल्या गैरवर्तनाची कहाणी सांगितली. ती म्हणाली की माझा बॉस मला कामासंबंधी टोचून बोलायचा आणि मला ओव्हरटाईम करायला लावायचा. महिला बराच वेळ ओव्हरटाईम करत राहिली. पण एके दिवशी तिने मनात ठरवलं की लवकरच कोणीतरी ती बॉसला धडा शिकवेल.
महिलेने योग्य संधीची वाट पाहिली!
त्या महिलेने दोन वर्षे त्या कंपनीत काम केले आणि शेवटी एके दिवशी महिलेने बॉसला सांगितले की तिचा नवरा शो आणि कॉन्सर्ट आयोजित करतो. त्यांना तिकीट हवे असल्यास ते घेऊ शकतात. यानंतर, एके दिवशी जेव्हा बॉसने महिलेला शो साठी तिकीट मागितले तेव्हा त्या महिलेने सांगितले की ते फक्त शहराबाहेर इतर शहरांमध्येच हे करतात.
अशी घडवली अद्दल
एके दिवशी बॉसने शहराबाहेर होणाऱ्या कॉन्सर्टचे तिकीट मागितले, तेव्हा महिलेने बॉसला सांगितले की तो तिथे पोहोचल्यावर तिचा नवरा तिला तिथेच भेटेल. बॉसला त्या महिलेच्या पतीचे नाव आणि नंबर माहित नव्हते, तरीही महिलेच्या सांगण्यावरून तो शहराबाहेर गेला आणि कॉन्सर्टच्या बाहेर पोहोचून त्या महिलेला फोन करून लागला. महिलेने तिचा फोन बंद करून ठेवला होता. त्यामुळे बॉसला काहीच कळू शकले नाही. बॉस अस्वस्थ झाला आणि इकडे महिलेने राजीनामा दिला. बॉसला महिलेच्या पतीचे नाव आणि नंबर माहीत नव्हते त्यामुळे बॉस काही काळ तिथेच भटकत राहिला.