तुरुंगातील कैदी मौल्यवान हिऱ्यांना पाडतात पैलू; महिन्याला करतात 20-30 हजारांची कमाई...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 02:55 PM2023-08-23T14:55:11+5:302023-08-23T14:56:08+5:30

Lajpore Central Jail: या राज्यातील तुरुंगात कैदी महिन्याला 25000 हिऱ्यांची निर्मिती करतात.

Lajpore Central Jail: Jail inmates in surat makes precious diamonds; Earning 20-30 thousand per month | तुरुंगातील कैदी मौल्यवान हिऱ्यांना पाडतात पैलू; महिन्याला करतात 20-30 हजारांची कमाई...

तुरुंगातील कैदी मौल्यवान हिऱ्यांना पाडतात पैलू; महिन्याला करतात 20-30 हजारांची कमाई...

googlenewsNext

सुरत: हिरा, हा जगातील सर्वात मौल्यवान रत्न आहे. खाणीमध्ये हा कच्चा स्वरुपात सापडतो, नंतर त्याला आकार दिला जातो. जगातील 70-80 टक्के हिऱ्यांना गुजरातमध्ये आकार दिला जातो. विशेष म्हणजे, गुजरातमधीलतुरुंगात दर महिन्याला 25000 हिरे बनवले जाता. ऐकून चकीत व्हाल, पण हे काम तुरुंगातील कैदी करतात. 

कैदी पाडतात हिऱ्यांना पैलू
डायमंड सिटी सुरतमधील लाजपोर मध्यवर्ती कारागृहात जगातील सर्वात मौल्यवान हिऱ्यांचे पॉलिश सेंटर म्हणून ओळखले जाते. हे जगातील एकमेव कारागृह आहे, जिथे नैसर्गिक हिऱ्यांना पॉलिश केले जातात आणि हे काम चक्क कैदी करतात. येथील कैदी हिऱ्यांना पॉलिश करण्यात माहीर आहेत. कारागृहातील कैद्यांना त्यांच्या कुटुंबाचा खर्च भागवता यावा, यासाठी हे काम दिले जाते. 

107 कैद्यांची टीम करते हे काम 
सध्या 107 कैद्यांची टीम कारागृहातील पॉलिशिंग युनिटमध्ये दररोज लहान आकाराच्या हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम करतात. प्रत्येक कैदी टेबल पॉलिश करुन महिन्याला 20 ते 30 हजार रुपये कमावतो. जेलचे प्रमुख एसपी जेएन देसाई म्हणाले की, येथील कैदी कोणतीही तक्रार न करता काम करतात आणि अनेक वर्षांपासून हे काम सुरळीतपणे चालू आहे.

बहुतांश कैदी कामात गुंतलेले असतात
लाजपोर कारागृहात बंदिस्त असलेल्या 3,000 कैद्यांपैकी बहुतांश कैदी फर्निचर आणि शिल्पकला बनविण्यासह कोणत्या ना कोणत्या रोजगारात गुंतलेले आहेत. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला 33 वर्षीय विपुल मेर डायमंड पॉलिशिंग युनिटमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतो. तुरुंगात जाण्यापूर्वी तो हिरे कारागीर होता. या कामाबाबत तो म्हणाला, तुरुंगात असूनही मी माझ्या कुटुंबाचा सांभाळ करण्यास सक्षम आहे. कैद्याला त्याच्या एकूण कमाईपैकी 2,100 रुपये प्रति महिना वैयक्तिक खर्च म्हणून कारागृहात ठेवण्याची परवानगी आहे. उर्वरित रक्कम त्यांच्या कुटुंबीयांना पाठवली जाते. 

Web Title: Lajpore Central Jail: Jail inmates in surat makes precious diamonds; Earning 20-30 thousand per month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.