VIDEO : लॅम्बॉर्गिनी कारच्या सायलेन्सरवर शिजवत होता 'कबाब', नंतर जे झालं ते बघतच रहाल....
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 14:41 IST2021-06-04T14:40:38+5:302021-06-04T14:41:38+5:30
हा व्हिडीओ ३१ मे रोजी एका यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत या व्हिडीओला ३ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आणि साधारण दोनेशेपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

VIDEO : लॅम्बॉर्गिनी कारच्या सायलेन्सरवर शिजवत होता 'कबाब', नंतर जे झालं ते बघतच रहाल....
ही घटना चीनची आहे. एक तरूणी लॅम्बॉर्गिनी कारच्या सायलेन्सरच्या आगीवर कबाब भाजण्याचा प्रयत्न करत होता. पण काह वेळाने कारच्या इंजिनातून धूर निघू लागल्याने एकच गोंधळ उडाला. ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा व्हिडीओ ३१ मे रोजी एका यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत या व्हिडीओला ३ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आणि साधारण दोनेशेपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. एकंदर असं दिसतंय की, कबाब शिजवण्याच्या नादात तरूणाने लॅम्बॉर्गिनीसारख्या महागड्या कारचं नुकसान करून घेतलं आहे.
या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक तरूण लॅम्बॉर्गिनी कारच्या सायलेन्सरमधून निघणाऱ्या आगीवर कबाब शिजवण्याचा प्रयत्न करत आहे. तर एक जण गाडीत बसून गाडी रेस करतोय. काही वेळाने अचानक कारमधून धुराचे लोळ निघू लागतत. तेव्हा सर्वांची धावपळ होते. तरूण लगेच धावत जाऊन कारचं बोनेट उघडतो तर काही वेळाने धूरही कमी होतो. यावेळी कारमधून काहीतरी लिकेजही होतं. पण हे पाहून हेच समजतं की, अति तिथे माती.