घरमालक असावा तर असा! घर विकून जुन्या भाडेकरूंनाही दिले लाखो रूपये...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 04:40 PM2021-08-17T16:40:26+5:302021-08-17T16:41:08+5:30

ही कहाणी आहे अमेरिकेतील एका अशा मालकाची ज्याने आपलं घर विकल्यावर त्यातील थोडा पैसा आपल्या भाडेकरूनांही दिला.

Landlord sells home and shares profits with former tenants in USA | घरमालक असावा तर असा! घर विकून जुन्या भाडेकरूंनाही दिले लाखो रूपये...

घरमालक असावा तर असा! घर विकून जुन्या भाडेकरूंनाही दिले लाखो रूपये...

Next

विद्यार्थी आणि नोकरी करणाऱ्या अविवाहित तरूणांपेक्षा जास्त घरमालकाला कुणी समजू शकत नाही. रूममद्ये शिरण्याआधी घराचं भाडं मागणारं, घराची दुरूस्ती करण्याच्या नावाखाली भाड्याची रक्कम वाढवणारे आणि वेळेवर भाडं दिलं नाही तर घरातून काढण्याची धमकी देणारे घर मालक तुम्हीही पाहिले असतील. पण जगात असेही काही घरमालक आहेत. ज्यांच्याबाबत वाचल्यावर हेच वाटतं की, सगळे घरमालक पैसे काढणारे किंवा भाडेकरूंचं शोषण करणारे नसतात.

ही कहाणी आहे अमेरिकेतील एका अशा मालकाची ज्याने आपलं घर विकल्यावर त्यातील थोडा पैसा आपल्या भाडेकरूनांही दिला. अमेरिकेतील मॅसाचुसेट्स राज्यात राहणारा क्रिश रोब्रेजने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. ज्यात त्याने  सांगितलं की, या जगात काही घरमालक असेही आहेत,  जे केवळ नशीबाने मिळतात.

११ ऑगस्टला रोब्रेजने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सांगितलं की, त्याच्या जुन्या घरमालकाने त्याला २५०० डॉ़लरचा (१.८५ लाख रपये) चेक आणि एक पत्र पाठवलं. जे मिळाल्यावर तो फार आनंदी आहे. त्याने चेक आणि पत्रही फेसबुकवर शेअर केलंय. ज्यावर आतापर्यंत ११ हजारांपेक्षा जास्त रिअॅक्शन आणि साधारण ५ हजार शेअर मिळाले आहेत. 

पत्रात लिहिलं की, हॅलो जुने भाडेकरूजी. जसं की तुम्हाला माहीत आहे. मी नुकतंच माझं घर विकलं. तुम्ही त्या  घराचे भाडेकरू होते. यादरम्यान तुम्ही जेही भाडं दिलं. त्याने मी या घरासाठी घेतलेल्या कर्जाचं व्याज चुकवू शकलो. मी प्रॉपर्टी विकल्यावर सगळा पैसा एकट्याने घेण्याच्या समाजाच्या भांडवलशाही  विचाराचा नाही. 

'मी घराचं भाडं त्यासाठी लागणाऱ्या खर्चाच्या बरोबरच ठेवण्याचा प्रयत्न केला.  सुरूवातीच्या काळात कर्जाचं  व्याज कमी असतं. मी तुम्हाला तुमच्या भाड्याचा काही भाग परत देत आहे. तसे तर हे जास्त नाहीत. पण ही रक्कम तुमची आहे.  ते फार सुंदर घर होतं आणि मला आनंद आहे की, मी ते तुमच्यासोबत शेअर केलं'.

रोब्रेजने लिहिले की, तो त्याच्या भावना योग्यपणे व्यक्त करू शकत नाहीये. तो म्हणाला की, काही लोक तत्वांच्या बाता मारतात. तर काही लोक तत्वांवरच जगतात. ही कहाणी शेअर करण्यामागचा त्याचा एकच उद्देश होता की, लोकांनी जीवन तत्वांसोबत जगावं. आपल्या घरमालकाकडून प्रेरित होऊन रोब्रेजने केवळ ५०० डॉलर जवळ ठेवले आणि उरलेले २ हजार डॉलर गरजूंना वाटण्याचा निर्णय घेतला.
 

Web Title: Landlord sells home and shares profits with former tenants in USA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.