वानराने रेल्वे स्टेशनवर कापला प्रवाशाचा कान, विंडोवर तिकीट खरेदी करत होती व्यक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 12:06 PM2024-05-13T12:06:41+5:302024-05-13T12:07:42+5:30

रामवृक्ष बरेलीला काही कामासाठी आले होते आणि काम संपल्यावर आपल्या घरी परत जात होते. तेव्हाच रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर एका वानराने त्यांच्यावर हल्ला केला.

Langur bites ear of male passenger at Bareilly Izzat Nagar railway station | वानराने रेल्वे स्टेशनवर कापला प्रवाशाचा कान, विंडोवर तिकीट खरेदी करत होती व्यक्ती

वानराने रेल्वे स्टेशनवर कापला प्रवाशाचा कान, विंडोवर तिकीट खरेदी करत होती व्यक्ती

अनेक पर्यटन स्थळांवर किंवा मंदिरांमध्ये माकडांची मोठी फौजच फौज बघायला मिळते. लोक त्यांना खायला देतात. पण कधी कधी काही अनुचित प्रकारही घडतात. माकड अनेकदा लोकांवर हल्ले करतात किंवा त्यांच्या वस्तू पळवतात. उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये इज्जत नगर रेल्वे स्टेशनवर एक फारच अजब घटना समोर आली आहे.

इथे एका एका वानराने एका प्रवाशावर हल्ला करत त्याचा कान कापला. व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला परिवारातील लोकांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्याच्यावर उपचार केल्यावर त्याला घरी सोडण्यात आलं आहे. ही घटना रेल्वे स्टेशनच्या विंडोवर तिकीट खरेदी करताना घडली.

या भागात राहणारे रामवृक्ष बरेलीला काही कामासाठी आले होते आणि काम संपल्यावर आपल्या घरी परत जात होते. तेव्हाच रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर एका वानराने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना काही समजायच्या आत वानराने त्यांचा कान कापला आणि तिथून पळून गेलं. आरडाओरडा झाल्यावर आजूबाजूचे लोक जमा झाले आणि जखमी व्यक्तीला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.

जखमी झालेल्या व्यक्तीने सांगितलं की, ते बरेलीच्या एका शाळेत चौकीदार आणि माळी म्हणून काम करतात. काम संपल्यावर ते घरी परत जात होते. तेव्हाच रेल्वे स्टेशनवर वानराने त्यांच्यावर हल्ला केला.

असं सांगण्यात आलं की, या स्टेशनवर माकडांचा नेहमीच हैदोस असतो. ते नेहमीच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर हल्ला करत असतात. त्यामुळे वैतागलेल्या रेल्वे स्टेशन अधिकाऱ्यांनी काही दिवसांआधी काही वानर भाड्याने मागवले होते. असं म्हटलं जातं की, वानर असल्यावर माकड तिथून पळून जातात.

पण ही घटना समोर आल्यावर स्टेशन अधिकाऱ्यांना लगेच वानरांना स्टेशनवरून हटवावं लागलं. अधिकाऱ्यांनी अशा कोणत्याही घटनेबाबत माहीत नसल्याचं सांगितलं. अधिकारी म्हणाले की, अशी कोणतीही घटना कानावर आली नाही आणि ना अशी घटना घडली.

Web Title: Langur bites ear of male passenger at Bareilly Izzat Nagar railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.