Large asteroid to pass by earth : २१ मार्चला सगळ्यात मोठं उल्कापिंड येणार; पृथ्वीवर असा होईल परिणाम, NASAच्या तज्ज्ञांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 16:28 IST2021-03-12T16:22:43+5:302021-03-12T16:28:45+5:30
Large asteroid to pass by earth : लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं पाहायला मिळत आहे. या उल्कापिंडाचा पृथ्वीवर कसा परिणाम होणार याबाबत नासाच्या तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.

Large asteroid to pass by earth : २१ मार्चला सगळ्यात मोठं उल्कापिंड येणार; पृथ्वीवर असा होईल परिणाम, NASAच्या तज्ज्ञांचा इशारा
कोरोनाच्या माहामारीपासून अजूनही जगभरातील लोकांना सुटका मिळालेली नाही. कोरोनाची लस उपलब्ध झाली असली तरिही संक्रमणाचं प्रमाण कमी झालेलं नाही. अशातच आता नासानं (NASA) २१ मार्चला पृथ्वीजवळ येणाऱ्या उल्कापिंडाद्दल (asteroid) माहिती दिली आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं पाहायला मिळत आहे. या उल्कापिंडाचा पृथ्वीवर कसा परिणाम होणार याबाबत नासाच्या तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.
नासाने केलेल्या दाव्यानुसार २१ मार्चला पृथ्वीच्या जवळून एक सगळ्यात मोठं उल्कापिंड जाणार आहे. याचे नाव त्यांनी एफओ- ३२ असल्याचे सांगितले आहे. नासानं एफओ ३२ बाबत अधिक माहिती देताना सांगितले की, याचा शोध २० वर्षांपूर्वी लावण्यात आला होता. हा स्टेरॉईड २० वर्ष आधीच शोधला आहे.
एफओ ३२ आता खूप वेगाने पृथ्वीच्या दिशेनं येत आहे. आतापर्यंतचे सगळ्यात मोठं उल्कापिंड असल्याचे सांगितले जात आहे. या उल्कापिंडाची लांबी ३ हजार फूट आहे. २१ मार्चला अंतराळातून पडलेला उल्कापिंड पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. हा उल्कापिंड पाहण्यासाठी वैज्ञानिक खूप उत्सुक आहेत. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा उल्कापिंड पडल्यानं पृथ्वीचं कोणतंही नुकसान होणार नाही.
काय सांगता? २९ हजार लिटर दारू उंदरांनी संपवली; पोलिसांचा दावा वाचून तुम्हीही व्हाल अवाक्....
नासा संशोधन केंद्राचे प्रमुख पॉल चौडास यांनी सांगितले की, उल्कापिंड पृथ्वीपासून १.२५ मिलियन अंतरवर असेल. यामुळे कोणतंही नुकसान होणार नाही. याचा वेग ७७ हजार प्रती तास असणार आहे. तरिही यामुळे पृथ्वीला कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचणार नाही. हे उल्कापिंड आकाशात दक्षिण दिशेला दिसून येणार आहे. हे चमकदार उल्कापिंड कोणीही पाहू शकेल. आता वैज्ञानिक २१ मार्चची प्रतिक्षा करत आहेत.