नोकरी सोड, घरी ये..; सांभाळ करण्यासाठी वृद्ध आई वडील मुलीला देतात 'इतका' पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 03:45 PM2023-05-23T15:45:37+5:302023-05-23T15:45:49+5:30

खरं तर ही गोष्ट आहे ४० वर्षीय निआननची. ती १५ वर्षे वृत्तसंस्थेत काम करत होती.

Leave job, come home..; Elderly parents pay 47 thousand' salary to daughter to take care of | नोकरी सोड, घरी ये..; सांभाळ करण्यासाठी वृद्ध आई वडील मुलीला देतात 'इतका' पगार

नोकरी सोड, घरी ये..; सांभाळ करण्यासाठी वृद्ध आई वडील मुलीला देतात 'इतका' पगार

googlenewsNext

म्हातारपणी आईवडिलांची सेवा करणे हे मुलांचे कर्तव्य मानले जाते. पण यासाठी कोणी पगार घेतला तर काय म्हणाल. साहजिकच तुम्हाला थोडं विचित्र वाटेल. पण अशीच एक घटना चीनमध्ये समोर आली आहे, जिथे एक मुलगी आपल्या वृद्ध आई-वडिलांची काळजी घेण्याच्या बदल्यात भरघोस पगार घेते. तेही पालकांच्या सांगण्यावरून. चिनी सोशल मीडियावर या मुलीची कहाणी खूप व्हायरल होत आहे. 

SCMP रिपोर्टनुसार, मुलीने तिच्या पालकांची काळजी घेण्यासाठी नोकरी सोडली होती. मात्र, त्या बदल्यात ती पालकांकडून नियमित पगार घेते. विशेष म्हणजे खुद्द पालकांनीच तिला ही ऑफर दिली होती. मुलीला दरमहा ४५ हजारांहून अधिक रुपये मिळतात. आई-वडील म्हणतात, 'तुला काम करायचे नसेल तर घरी राहा आणि आमच्यासोबत वेळ घालव. 

मुलीला घरीच ठेवण्याची आईवडिलांची इच्छा
खरं तर ही गोष्ट आहे ४० वर्षीय निआननची. ती १५ वर्षे वृत्तसंस्थेत काम करत होती. कामाचा ताण खूप वाढला होता. ती कायम चिंतेत असायची. दरम्यान, तिने तिच्या पालकांशी संपर्क साधला. आई-वडिलांचे मन पिघळले, त्यांनी मुलीला घरी बोलावण्याचा निर्णय घेतला. पण नोकरीचा प्रश्न असल्याने निआनन यायला तयार नव्हती. अशा परिस्थितीत पालकांना एक कल्पना सुचली.

पालकांनी सांगितले की, जर तू घरात राहून आमची काळजी घेतली तर त्या बदल्यात आम्ही तुझ्या आर्थिक गरजांची काळजी घेऊ. तुला चांगला पगार देऊ. जो तिला सध्याच्या नोकरीत मिळत असलेल्या पगारापेक्षा जास्त असेल. निआननला हा प्रस्ताव आवडला. सध्या ती गेल्या काही महिन्यांपासून आई-वडिलांच्या घरी राहात असून काळजीपोटी पगार घेत आहे.

निआननच्या पालकांची मासिक पेन्शन १२ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. यातील ४७ हजार रुपये ते आपल्या मुलीला घरी राहून सेवा करण्यासाठी देतात. एवढेच नाही तर आई-वडिलांनी निआननला सूटही दिली आहे की तिला चांगली नोकरी मिळाली तर ती जाऊ शकते. निआनन म्हणते की तिचं आयुष्य खूप आरामदायी झालं आहे. दर महिन्याला ती फॅमिली ट्रिपला जाते.

Web Title: Leave job, come home..; Elderly parents pay 47 thousand' salary to daughter to take care of

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.