डाव्या विचारसरणीचा वर हवा
By admin | Published: May 6, 2017 01:00 AM2017-05-06T01:00:38+5:302017-05-06T01:00:38+5:30
वर-वधू पाहिजेच्या जाहिरातीत रंगरूप, शरीरयष्टी, शिक्षण आणि जात यांचा उल्लेख ही अत्यंत सामान्य बाब आहे; मात्र या बंगाली
कोलकाता : वर-वधू पाहिजेच्या जाहिरातीत रंगरूप, शरीरयष्टी, शिक्षण आणि जात यांचा उल्लेख ही अत्यंत सामान्य बाब आहे; मात्र या बंगाली मुलीने आपल्या जाहिरातीत अनोखी मागणी करून इतिहास घडविला. यापूर्वी अशी जाहिरात तुमच्या कधी पाहण्यात आली नसेल. अगदी लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळांसाठीही अनोखी ठरावी अशी ही जाहिरात आहे. कोलकात्यातील एका कुटुंबाला २६ वर्षांच्या मुलीसाठी डाव्या विचारसरणीचा वर हवा आहे. ही मुलगी एमए आहे. दीप्तानुज दासगुप्ता यांनी आपल्या बहिणीच्या विवाहासाठीची ही जाहिरात भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे (मार्क्सवादी) मुखपत्र गणशक्तीत प्रकाशित केली आहे. या मुलीच्या भावाने म्हटले की, डावे लोक संकुचित विचारसरणीचे नसतात, असे आम्ही मानतो. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांना रुची असते. ते मोठ्या गोष्टींचा विचार करतात. आमच्या घरात असेच वातावरण आहे. त्यामुळे आम्हाला बहिणीसाठी स्वत:ला डाव्या विचारसरणीचा म्हणवण्यात गर्व वाटणारा पती हवा आहे.