बोंबला! ...जेव्हा महापौरच लॉकडाऊनचे नियम तोडून गर्लफ्रेन्ड भेटायला तिच्या घरी जातात!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 02:50 PM2020-07-03T14:50:10+5:302020-07-03T15:02:35+5:30
लॉकडाऊन दरम्यान सर्वसामान्य लोक सरकारने कितीही घरात राहण्यास सांगितले तरी काहीना काही कारणाने बाहेर पडतातच. पण जेव्हा घरात रहा असं सांगणारेच नियम तोडून बाहेर पडू लागले तर...अशीच एक घटना समोर आली आहे.
ब्रिटनच्या लिसेंस्टर सिटीच्या 71 वर्षीय लेबर पार्टीचे महापौर सर पीटर सोल्सबी यांच्याव सध्या जोरदार टीका केली जात आहे. कारण नुकतेच ते लॉकडाऊनची नियम मोडून आपल्या गर्लफ्रेन्डला भेटायला गेले होते. ते लॉकडाऊनचा नियम मोडून केवळ गर्लफ्रेन्डला भेटायलाच गेले नाही तर रात्रभर तिच्या घरीही राहिले. महापौर सोल्सबी एप्रिल आणि मे महिन्यात आपल्या 64 वर्षीय गर्लफ्रेन्ड समर्सलॅंडच्या घरी गेले होते.
समर्सलॅंडच्या शेजाऱ्यांनी मेअर तिच्या घरी येताना-जाताना फोटो काढले. मेअर गर्लफ्रेन्डच्या घरी बॅग घेऊन येत होते आणि रात्रभर थांबत होते. नुकतीच घोषणा करण्यात आली होती की, लिसेस्टरच्या 3, 30,000 लोकसंख्येला आणखी दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊनमध्ये रहावं लागेल.
शेजाऱ्यांनी लेबर पार्टीच्या मेअरना त्यांची गर्लफ्रेन्ड समर्मलॅंडच्या घरी अनेकदा पाहिलं आणि त्यांचे फोटो काढले. एका फोटोत सॉल्सबी आपल्या गर्लफ्रेन्डच्या घराच्या खिडकीत शिडीच्या मदतीने उभे आहेत. यात ते गर्लफ्रेन्डसोबत बोलताना दिसत आहेत. हास्यास्पद बाब म्हणजे मेअर पूर्ण मे महिन्यात त्यांच्या सोशल मीडियात अकाऊंटवरून हा संदेश देत आहेत की, 'घरीच सुरक्षित रहा'.
हे फोटो सार्वजनिक झाल्यावर पोलिसांनी मेअरसोबत चर्चा केली आणि त्यांना घरीच राहण्याचा सल्ला दिला. पण मीडियाने जेव्हा त्यांना याबाबत विचारले तेव्हा ते म्हणाले की, मला नाही वाटत की, कुणीही हा दावा करेल की, माझ्या अशा वागण्यामुळे कुणाला कोरोनाचं संक्रमण होऊ शकतं. असं करणं निश्चितपणे लॉकडाऊनच्या आत्म्या विरोधात आहे, पण नियमांच्या अजिबात विरोधात नाही. सोबतच त्यांनी नियम तोडल्याबद्दल माफीही मागितली.
काय सांगता! ...म्हणून एका अस्वलाला सुनावली गेली चक्क मृत्युदंडाची शिक्षा, अनेकांनी केला विरोध!
बोंबला! मेथीची भाजी समजून घरातील सर्वांनी चवीने खाल्ला गांजा अन्.....