Leopard Attack Video: सायकलवरुन जाणाऱ्या व्यक्तीवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; पहा थरकाप उडवणारा Video...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 03:37 PM2022-09-22T15:37:02+5:302022-09-22T15:48:42+5:30

सोशल मीडियावर प्राण्यांच्या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Leopard Attack Video: Fatal attack of a leopard on a person riding a bicycle; Watch the shocking video... | Leopard Attack Video: सायकलवरुन जाणाऱ्या व्यक्तीवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; पहा थरकाप उडवणारा Video...

Leopard Attack Video: सायकलवरुन जाणाऱ्या व्यक्तीवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; पहा थरकाप उडवणारा Video...

Next

Leopard Attack Video: सोशल मीडियावर प्राण्यांचे माणसावरील हल्ल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. एका बिबट्याने (Leopard) सायकलवरुन जाणाऱ्या व्यक्तीवर अचानक हल्ला केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा बिबट्याच्या हल्ल्याचा व्हिडिओ असाम राज्यातील असल्याचे सांगितले जात आहे.

जून महिन्यात घडलेल्या या घटेचा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर शहारे उभे राहतील. व्हिडिओच्या सुरुवातीला जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावरुन एक सायकलस्वार जाताना दिसतोय. काही सेकंदानंतर अचानक एक बिबट्या त्याच्यावर हल्ला करतो. 

सायकल चालवणाऱ्या व्यक्तीला काही कळायच्या आत तो बिबट्या त्याचयावर हल्ला करतो. एक-दोन सेकंदाच्या झटापटीनंतर बिबट्या तेथून पळ काढतो. सुदैवाने या घटनेत त्या व्यक्तीला गंभीर ईजा होत नाही. बिबट्या गेल्यानंतर तो व्यक्ती सायकल घेऊन माघारी पळून येतो. आतापर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून, अनेकजण यावर कमेंट्स करत आहेत.
 

Web Title: Leopard Attack Video: Fatal attack of a leopard on a person riding a bicycle; Watch the shocking video...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.