सिंहाने हरणाला दिले जीवदान
By admin | Published: May 31, 2017 12:55 AM2017-05-31T00:55:49+5:302017-05-31T00:55:49+5:30
सिंहाच्या पुढ्यात जर आयतीच शिकार आली तर? क्षणार्धात सिंह त्याचा फडशा पाडल्याशिवाय राहत नाही; पण दक्षिण आफ्रिकेतील
केप टाउन : सिंहाच्या पुढ्यात जर आयतीच शिकार आली तर? क्षणार्धात सिंह त्याचा फडशा पाडल्याशिवाय राहत नाही; पण दक्षिण आफ्रिकेतील ही घटना ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही. त्याचे झाले असे की, येथील एका नॅशनल पार्कमध्ये हरणाचे एक पाडस खेळत खेळत थेट सिंहाच्या पुढ्यात जाऊन बसले. सिंहाने त्याला खाण्याचा प्रयत्न केला खरा. मात्र, पुन्हा विचार बदलला. ते हरीण तेथेच खेळू लागले. या निरागस हरणाला पाहून कदाचित सिंहालाही त्याची दया आली असावी. जो सिंह हरणाला खाणार होता तोच त्याचा संरक्षक बनला. कारण, दुसऱ्या सिंहांनाही तो जवळ येऊ देत नव्हता. एका सिंहाने हरणाला खाण्याचा प्रयत्न केला, तर या सिंहाने त्या सिंहावर हल्ला केला. हा सिंह चक्क त्या हरणाशी खेळत बसला. हे दृश्य बघत असलेल्या लोकांनी याचा व्हिडिओ करून सोशल मीडियावर पोस्ट केली. सध्या या व्हिडिओची बरीच चर्चा आहे.