जंगलातला सिंह निघाला शहरात पर्यटनाला, व्हिडिओ बघुन लोक बोलले...अरे हा तर बब्बर शेर!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 02:02 PM2021-08-02T14:02:35+5:302021-08-02T14:05:42+5:30
हा सिंह रस्त्यावरून असा चाललाय की जसं काही हा त्याच्या गुहेतच फिरतोय. आजूबाजूला कोणी नसल्याने सिंहही सुरक्षित आहे आणि माणसंही पण या पठ्ठ्याची एट पाहुन तुम्ही म्हणाल...
गुजरातमधील सासन गिरमधील देवलिया पार्क सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरतंय. त्याचं कारणही तसंच आहे. या पार्कमधील एक व्हिडिओ सर्वांचं लक्ष वेधुन घेतोय. या व्हिडिओत जंगलाचा राजा सिंह अगदी आरामात रस्त्यावर फिरताना दिसतोय. गुजरातमध्ये अशी घटना घडण्याचा हा काही पहिला प्रकार नाही. याआधी अशा घटना गुजरातमध्ये घडलेल्या आहेत.
Meanwhile king entering Devaliya park, Sasan Gir#TwitterNatureCommunity#wildlifepic.twitter.com/wAQfxzW1u3
— Zubin Ashara (@zubinashara) July 31, 2021
झुबीन अशारा (Zubin Ashara) या युजरने ट्वीटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत तुम्ही पाहु शकता एक सिंह सासन गिर नॅशनल पार्कमध्ये अगदी आरामात फिरतोय. हा सिंह रस्त्यावरून असा चाललाय की जसं काही हा त्याच्या गुहेतच फिरतोय. आजूबाजूला कोणी नसल्याने सिंहही सुरक्षित आहे आणि माणसंही पण या पठ्ठ्याची एट पाहुन झुबीन यांनी कॅप्शनही भारी दिलीय. त्यांनी म्हटलंय, जंगलाचा राजा पार्कमध्ये एंट्री घेताना.
Came from wild..?
— Surender Mehra IFS (@surenmehra) July 31, 2021
झुबीन यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर अनेक कमेंट्स येत आहेत. आयएफएस सुरेंद्र मेहरा यांनी त्यांना व्हिडिओवर कमेंट करत प्रश्न विचारालाय, हा सिंह जंगलातून आला आहे का? यावर झुबीन यांनी उत्तर दिलंय, हो, कारण तो पार्कच्या बाहेरुन आत शिरतोय. याशिवाय इतरांनाही काही कमेंट्स केल्या आहेत.
Imagine encountering on a Sunday walk 🤣
— Jayanti Dey (@jdey63) July 31, 2021
Chal ghumne chalte he aaj
— jatin (@DoctorDoomUsa) July 31, 2021