बोंबला! लॉकडाऊनमध्ये बटर चिकन खाण्यासाठी बाहेर पडणं पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला इतक्या लाखांचा दंड!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 10:44 AM2020-07-21T10:44:24+5:302020-07-21T10:46:33+5:30

कोरोनामुळे लॉकडाऊनची स्थिती आहे. हॉटेल रेस्टॉरन्ट, बार सगळं काही बंद आहे. अशात तुम्हाला जर तुमच्या आवडीचं काही खाण्याची इच्छा होत असेल तर तुम्ही कोरोनाच्या भीतीने एकतर घरातच थांबाल

Lockdown coronavirus fine 1652 dollor Australia Melbourn 1 lakhs rupees | बोंबला! लॉकडाऊनमध्ये बटर चिकन खाण्यासाठी बाहेर पडणं पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला इतक्या लाखांचा दंड!

बोंबला! लॉकडाऊनमध्ये बटर चिकन खाण्यासाठी बाहेर पडणं पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला इतक्या लाखांचा दंड!

Next

ऐन कोरोना काळात लोकांनी गटारी पौर्णिमा मांसाहारावर ताव मारून साजरी केली. मांस खरेदी करण्यासाठी दुकानांसमोर रांगाच रांगा बघायला मिळाल्या. अशात ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरातील एक अजब घटना समोर आली आहे. ज्याबाबत वाचून तुम्ही चक्रावून जाल. जगभरात अजूनही अनेक ठिकाणी कोरोनामुळे लॉकडाऊनची स्थिती आहे. हॉटेल रेस्टॉरन्ट, बार सगळं काही बंद आहे. अशात तुम्हाला जर तुमच्या आवडीचं काही खाण्याची इच्छा होत असेल तर तुम्ही कोरोनाच्या भीतीने एकतर घरातच थांबाल किंवा घरीच तो पदार्थ बनवण्याचा प्रयत्न कराल. पण एका व्यक्तीने उलटं केलं.

मेलबर्नमध्ये एक व्यक्ती आपल्या आवडीचं बटर चिकन खाण्यासाठी ३२ किलोमीटर दूर गेला. पण ते बटर चिकन त्याला १ लाख २३ हजार रूपयांना पडलं. आता सगळेच याने हैराण झाले आहेत. प्रश्नही पडलाय की, कसं कुणी इतकं महाग चिकन खाऊ शकतं.

इंडिया टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, बटर चिकन खाण्यासाठी या व्यक्तीने मेलबर्नच्या सीबीडीपासून ३ किलोमीटर दक्षिण पश्चिमेतील वेब्रिएपासून आपला प्रवास सुरू केला. लॉकडाऊनमध्ये प्रवास केल्याने त्याला १६५२ डॉलरचा दंड लावण्यात आला.

१६५२ डॉलर हे भारतीय करन्सीनुसार १ लाख २३ रूपये इतके होतात. मेलबर्न पोलिसांनुसार या वीकेंडमध्ये ७४ लोकांना फाइन भरावा लागला. या सर्वांनी लॉकडाऊनचा नियम मोडला होता. तुम्हालाही असा इतका दंड भरायचा नसेल तर घरातच रहा.

ऑस्ट्रेलियात आतापर्यंत कोरोनाच्या १२ हजारापेक्षा जास्त केसेस सापडल्या आहेत. मेलबर्नमध्ये गेल्या गुरूवारपासून नवा लॉकडाऊन सुरू झाला आहे. ज्यात काही दिशा-निर्देश देण्यात आले आहेत. व्यायाम करणे, वस्तू खरेदी करणे आणि शाळेत जाणे यासाठी दंड भरावा लागणार नाही.

कडक सल्यूट! रेल्वे स्टेशनच्या टॉयलेटमध्ये महिलेने दिला मृत बाळाला जन्म, पोलिसांनी 'असं' दिलं जीवनदान!

गन मॉडेल टोनी एका व्यक्तीवर ६ गोळ्या झाडून वादात, आपल्या निशाण्यासाठी आहे ती लोकप्रिय!

Web Title: Lockdown coronavirus fine 1652 dollor Australia Melbourn 1 lakhs rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.