Lockdown: हेच ऐकायचं बाकी होतं! कोरोनामुळे लग्न रद्द झालं तरी ‘या’ कपल्सची हनीमूनला जाण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 04:59 PM2020-06-10T16:59:22+5:302020-06-10T17:00:10+5:30
कोरोनाचा परिणाम सर्वसामान्य माणसांच्या जीवनावर पडला आहे. त्यातच आता लग्न रद्द झालं असलं तरी काही कपल्स थेट हनीमूनला जाण्याच्या तयारीत आहे.
नवी दिल्ली – चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेक लोक दहशतीच्या सावटाखाली जगत आहेत, जगातील बहुतांश देशांनी कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु केलं, त्यामुळे यंदा कर्तव्य असणाऱ्या जोडप्यांची चांगलीच पंचाईत झाली, लॉकडाऊनपुर्वी अनेकांची लग्न जुळाले, तारखा निश्चित झाल्या पण लॉकडाऊन सर्व नियोजनावर पाणी फिरलं.
कोरोनाचा परिणाम सर्वसामान्य माणसांच्या जीवनावर पडला आहे. त्यातच आता लग्न रद्द झालं असलं तरी काही कपल्स थेट हनीमूनला जाण्याच्या तयारीत आहे. काहींची लग्न झाली अन् हनीमूनला गेले, ते महिना झालं तरी दुसऱ्या देशात अडकून पडलेत, लॉकडाऊनमुळे लग्न रद्द करावी लागल्याने कपल्सने आता हनीमूनला जाण्याचं प्लॅनिंग केले आहे.
ब्रिटिश टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार, लंडनमध्ये राहणारी क्लेयरचं लग्न सप्टेंबरमध्ये होणार होतं, मात्र कोरोनाचं संकट आणि सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे कठोर पालन यामुळे त्यांनी लग्न रद्द केले. लॉकडाऊनमुळे कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न करण्याची भीती त्यांना वाटते, क्लेयरने सांगितले की, आमचं लग्न रद्द झालं असलं तरी माझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत हनीमूनला जाण्याचा विचार करत आहोत. फक्त प्रवासावरील बंदी कधी हटवली जात आहे याची सध्या वाट पाहत आहोत असं ती म्हणाली.
लग्न रद्द झालेल्या क्लेयरने मलेशियाला हनीमूनला जाण्यासाठी प्लॅनिंगही केले आहे. जितकं लग्न करण्यासाठी आम्ही उत्साहित होतो तितकचं हनीमूनबाबतही होतं, कोरोनामुळे पर्यटन व्यवसायाचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे पर्यटन करण्यावर आमचा भर असेल. पारंपारिक पद्धतीने हनीमून करण्याचा आमची इच्छा नाही, मी माझ्या भावी नवऱ्यासोबत दक्षिण अशियाच्या उंच डोंगरावर ट्रेकिंग करत कॅम्पमध्ये रात्र घालवायची होती असं क्लेयरने सांगितले.
याचप्रकारे लंडनमध्ये राहणारी लौरा हिचं लग्नही कोरोनामुळे रद्द झालं. लौराही हनीमूनला जाण्याचं प्लॅनिंग करत आहे. आयुष्य खूप छोटं आहे, मुलं होण्यापूर्वी आम्हाला जास्तीत जास्त फिरायचं आहे. लौरा यापूर्वी मालदिवला जाणार होती पण आता नोव्हेंबरमध्ये हनीमूनसाठी साऊथ आफ्रिकेला जाणार आहे. ब्रिटन टूर ऑपरेटर्सनेही सांगितले की, आमच्याकडे सध्या हनीमूनला जाण्यासाठी अशा कपल्सचे फोन येत आहेत ज्यांचे लग्न कोरोनामुळे रद्द झालं आहे आणि त्यांची संख्याही मोठी आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
होय, चीननं भारताच्या ‘या’ जमिनीवर कब्जा केलाय; लडाखमधील भाजपा खासदारानं दिली यादी
Video:...अन् मनसे नेत्याच्या डोळ्यातून अश्रू अनावर; रुग्णालयातील बिकट परिस्थितीचा भयावह अनुभव
Parle G: स्वदेशी आंदोलनातून मिळाली प्रेरणा; जगात गाजणाऱ्या बिस्किट कंपनीचा ‘असा’ आहे इतिहास!
...म्हणून येत्या १२ जूनला संध्याकाळी ५ वाजता राज्य सरकारविरोधात मनसे करणार आंदोलन
‘या’ तारखेपासून राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार; सूत्रांची माहिती