लय भारी! लॉकडाऊनमुळे कोल्हापूरच्या जवानाचं ऑनलाइन शुभमंगल सावधान...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 01:23 PM2020-04-16T13:23:11+5:302020-04-16T14:03:14+5:30

ऐन उन्हाळ्यात म्हणजेच लग्नसंमारंभाच्या कालावधीत लॉकडाऊन झाल्यामुळे लोकांना सगळं काही रद्द करावं लागलं आहे.

Lockdown : kolhapur wedding ceremony through facebook 270 people participated in lockdown myb | लय भारी! लॉकडाऊनमुळे कोल्हापूरच्या जवानाचं ऑनलाइन शुभमंगल सावधान...

लय भारी! लॉकडाऊनमुळे कोल्हापूरच्या जवानाचं ऑनलाइन शुभमंगल सावधान...

googlenewsNext

कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरासह भारतात सुद्धा झपाट्याने होत आहे.  लोकांना सुरक्षित राहता यावं आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता यावा यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे लोक आपापल्या घरी सुरक्षित असेल तरी सगळं काही अचानक झाल्यामुळे अनेकांची गैरसोय झाली आहे.

ऐन उन्हाळ्यात म्हणजेच लग्नसंमारंभाच्या कालावधीत लॉकडाऊन झाल्यामुळे लोकांना सगळं काही रद्द करावं लागलं आहे. तर काहींनी घरच्याघरीच जुगाड करून डिजिटल लग्न केल्याच्या अनेक घटना तुम्हाला माहीत असतील. आज आम्ही तुम्हाला अशाच एका जवानाच्या लग्नाबद्दल सांगणार आहोत. कोल्हापूर जिल्ह्यात या परिस्थितीतही एक लग्न पार पडलं.

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील अर्जुनवाडी या गावातील अविनाश दोरुगडे आणि चंदगड तालुक्यातील कुदनुर गावातील रूपाली निर्मळकर या दोघांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला आहे. फक्त पुजारी आणि वधू वर हे तिघेजण याच या लग्नाला उपस्थित होते. या तिघांनीही सोशल डिस्टेंसिंग ठेवूनच हा विवाहसोहळा पार पाडला. यांनी मास्कचा वापर सुद्धा केला होता. महत्त्वाचं म्हणजे या लग्नात तब्बल २०० हून अधिक नातेवाईक होते पण तेही ऑनलाईन मोबाईलवरूनचं सहभागी होते. ऑनलाईन अक्षता टाकत वधू-वराला शुभेच्छा दिल्या. ( हे पण वाचा-CoronaVirus : "साहेब, कोरोनाची नाही तर खराब रस्त्यांची भीती वाटते")

इतकंच नाही तर या जोडप्यांनी लग्नामध्ये जमलेला अहेर मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे.  हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. यातील नवरामुलगा अविनाश हा सीआरपीएफमध्ये असून त्याची नेमणूक सध्या झारखंडमध्ये आहे . त्याच्या पत्नीचे नाव रुपाली असून ती ग्रॅजुएट आहे. सर्व स्तरावर या जोडप्यांचं कौतुक केलं जात आहे. ( हे पण वाचा-"तुमच्या शरीराचा कोपरा अन् कोपरा तोडू, पण तुम्हाला कोरोना होऊ देणार नाही" )

Web Title: Lockdown : kolhapur wedding ceremony through facebook 270 people participated in lockdown myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.