Lockdown: १८ वर्षापूर्वी ज्याच्यावर अंत्यसंस्कार केले ‘तो’ पुन्हा घरी जिवंत परतला; मुलींनी केलं स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 11:03 AM2020-06-03T11:03:57+5:302020-06-03T11:05:50+5:30
जंगल सालिकराम हे पादरी बाजारच्या बेचन कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ऑक्टोबर २००२ मध्ये पंजाबला गेले होते.
गोरखपूर – कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे, या लॉकडाऊनमुळे अनेकांचे कामकाज ठप्प झाले आहेत, अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यातच अशा काही घटना घडत आहेत ज्यामुळे बेपत्ता झालेली माणसं पुन्हा आपल्या कुटुंबाकडे परतत आहेत. गोरखपूरमध्ये अशीच एक अनोखी घटना पाहायला मिळाली, ज्या व्यक्तीवर त्याची पत्नी आणि मुलींनी अंत्यसंस्कार केले तो लॉकडाऊन काळात तब्बल १८ वर्षानंतर घरी परतला आहे.
जंगल सालिकराम हे पादरी बाजारच्या बेचन कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ऑक्टोबर २००२ मध्ये पंजाबला गेले होते. मेहनत, मजुरीमुळे ते घरी परतले नाहीत, काही दिवसानंतर हरियाणा, दिल्ली येथे मजुरी करत स्वत:चा उदरनिर्वाह करत आणि फुटपाथवर झोपत होते. लॉकडाऊनमुळे कामकाज बंद झालं. उपासमारीची वेळ आल्यानंतर याला कुटुंबाची आठवण झाली. एका ट्रकातून तो ५ मे रोजी पादरीबाजार येथे आला. पत्नी माहेरी गेल्यामुळे तिची भेट झाली नाही, पण २ मुलींनी त्यांचे स्वागत केले.
या व्यक्तीला ४ मुली आहेत, दोन मुलींचे लग्न झाले आहे, सध्या घरात २ मुली राहत आहेत. मुलींनी सांगितल्यानुसार २००२ मध्ये सालिकाराम कमवण्यासाठी घर सोडून गेले ते कधीच परतले नाहीत. आईसह सर्व कुटुंबाला वाटलं त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर २०१२ मध्ये वडिलांचा प्रतिकात्मक पुतळा बांधळा आणि त्यावर जंगलात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूनंतर जी अधिकृतपणे कागदपत्रे होती त्याची पूर्तता केली. पण इतक्या वर्षांनी जिवंत असलेल्या पित्याला पाहून मुलींचा आनंद गगनात मावेना झाला आहे. मात्र या घटनेमुळे वडिलांना पश्चाताप होत आहे. कामकाजामुळे गोरखपूरला कधीच घरी आले नाहीत. आता याठिकाणीच काम करणार आणि मुलींचे लग्न चांगल्या घरात लावणार असल्याचं त्यांनी सांगितले.
पती घरी न परतल्यामुळे पत्नी चिंता देवी यांच्यासमोर मुलींच्या संगोपनाचं मोठं संकट उभं राहिलं. घरोघरी भांडी घासण्याचं काम त्यांनी सुरु केले. मुलींना मोठं करुन दोघींचे लग्न लावलं. सालिकाराम भलेही १८ वर्षानंतर घरी परतला असेल पण इतकी वर्ष त्यांनी कुटुंबाला दुखा:त ठेवलं. त्यामुळे नाराज पत्नी घर सोडून गेली, जेव्हा नवऱ्याची गरज होती, अन्नासाठी वणवण भटकावं लागत होतं, तेव्हा ते कुटुंबासोबत नव्हते, आता काम मिळालं नाही, खाण्याचे वांदे झाले म्हणून १८ वर्षानंतर ते घरी परतले, अशा नवऱ्याची गरज नाही, ज्याला आपलं घर आणि कुटुंब सांभाळता येत नाही असं नाराज पत्नी चिंता देवी यांनी व्यथा मांडली.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Cyclone Nisarga Live Updates: 'निसर्ग' चक्रीवादळाचा वेग वाढला, एक वाजेपर्यंत धडकण्याची शक्यता
निसर्ग' चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी एनडीआरएफची टीम सज्ज
हजारोंच्या गर्दीतही कोरोना संक्रमित रुग्ण शोधणार; भारतीय विद्यार्थ्यांनी बनवला ‘असा’ अविष्कार!
लॉकडाऊनमध्ये अडकले हिंदू नवरीचं कुटुंब; मुस्लीम कुटुंबाने कन्यादान करत पार पाडलं लग्न
कोरोनापाठोपाठ आणखी एक संकट; ‘या’ देशात रक्त पिणाऱ्या किड्यांचा हल्ला!