Loco Pilot Stops Train: चहासाठी काय पण! आवडता चहा पिण्यासाठी लोको पायलटने थांबवली ट्रेन, Photo व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 04:18 PM2022-04-26T16:18:18+5:302022-04-26T16:18:39+5:30

Loco Pilot Stops Train For Tea: बिहारच्या सिवानमध्ये ही घटना घडली असून, याचा फोटोही सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

Loco Pilot Stops Train: Loco pilot stops train to drink his favorite tea, Photo viral | Loco Pilot Stops Train: चहासाठी काय पण! आवडता चहा पिण्यासाठी लोको पायलटने थांबवली ट्रेन, Photo व्हायरल

Loco Pilot Stops Train: चहासाठी काय पण! आवडता चहा पिण्यासाठी लोको पायलटने थांबवली ट्रेन, Photo व्हायरल

Next

Loco Pilot Stops Train For Tea: भारतात असंख्य चहाप्रेमी आहेत. चहासाठी लोक काहीही करायला तयार होतात. अशीच एक घटना बिहारमध्ये घडली आहे. आवडता चहा पिण्यासाठी ट्रेनच्या लोको पायलटने चक्क ट्रेनच थांबवल्याची घटना सिवानमध्ये घडली आहे. यावेळी लोको पायलटने चहाचा आनंद घेतला, पण त्याच्यामुळे शेकडो लोकांना अडचणीचा सामना करावा लागला. 

मिळालेल्या माहितीनुसार, 11123 डाउन झांसी एक्सप्रेसच्या लोको पायलटने सिसवन ढालावर ट्रेन थांबवली. यावेळी दोन्ही बाजूचे फाटक बंद होते, त्यामुळे एकीकडे ट्रेनमधील प्रवाशांना वाट पाहावी लागली आणि दुसरीकडे रस्त्यावर थांबलेल्या लोकांमुळे मोठा ट्रॅफिक जाम झाला. काहीवेळानंतर गार्ड चहा घेऊन आला, तेव्हाच फाटक उघडले गेले. 

ग्वालियर मेल एक्सप्रेसची घटना
झांसी म्हणजेच ग्वालियर मेल एक्सप्रेस सकाळी 5:27 वाजता सिवान स्टेशनला पोहोचली. यादरम्यान ट्रेनचा सहाय्यक लोको पायलट चहा घेण्यासाठी ट्रेनमधून उतरला आणि सिसवन ढालाकडे चहा घेण्यासाठी गेला. यादरम्यान 5.30 वाजले आणि ट्रेन सुरू होण्याची वेळ झाली. यादरम्यान, दुसऱ्या एका लोको पायलटला माहित होते की, एकजण सिसवन ढालाकडे आहे, त्यामुळे त्याने हळुहळून ट्रेन ढालावर नेऊन थांबवली. यानंतर खाली उतरलेला लोको पायलट ट्रेनमध्ये चढला आणि ट्रेन आपल्या दिशेने मार्गस्थ झाली. याप्रकरणी स्टेशन अधीक्षक अनंत कुमार यांनी माहिती घेऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

Web Title: Loco Pilot Stops Train: Loco pilot stops train to drink his favorite tea, Photo viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.