ममता दीदींचे वागणे सद्दाम हुसैनप्रमाणे : विवेक ओबेरॉय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 05:49 PM2019-05-15T17:49:07+5:302019-05-15T17:56:03+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकमध्ये प्रमुख भूमिका करणाऱ्या विवेक ट्विटरच्या माध्यमातून ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यात मतदान होण्याच्या आधीच राजकीय वातावरण तापले आहे. कोलकात्यात भाजप अध्यक्ष अमित शहांच्या रोडशो दरम्यान तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड हाणामारीचा घटनेचा राजकीय पडसाद आज दिवसभर पहायला मिळाला. राजकीय वर्तुळात याविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. मात्र याविषयी पहिल्यांदाच कोणत्यातरी कलाकाराने भाष्य केलं आहे. ममता बॅनर्जी हुकुमशहा सद्दाम हुसैनप्रमाणे वागत आहेत अशी टीका विवेक ओबेरॉय याने, कोलकात्यात काल झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकमध्ये प्रमुख भूमिका करणाऱ्या विवेक ट्विटरच्या माध्यमातून ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. मला कळत नाही दीदींसारखे आदरणीय व्यक्तिमत्त्व सद्दाम हुसैनप्रमाणे का वागत आहे. खरं तर लोकशाही खतरे में है अशी मागणी करणाऱ्या ममता दीदींमुळेच लोकशाही धोक्यात आली आहे. दीदींची ही दीदीगिरी चालणार नाही अशी टीका विवेक ओबेरॉयने केली.
I can’t understand why a respected lady like Didi is behaving like Saddam Hussain! Ironically, democracy is under threat and in danger by Dictator Didi herself. First #PriyankaSharma & now #TajinderBagga. यह दीदीगिरी नही चलेगी ! #SaveBengalSaveDemocracy#FreeTajinderBaggapic.twitter.com/oRq596aljH
— Vivek Anand Oberoi (@vivekoberoi) May 15, 2019
नथुराम गोडसे प्रकरणी वादग्रस्त विधान करणाऱ्या कमल हसन यांच्या सुद्धा विवेक ओबेरॉयने याने समाचार घेतला होता.देशाचे विभाजन करण्याच्या अधिकार कुणालच नाही. दहशतवाद्याचा कोणताही धर्म नसतो. मुस्लीम मते मिळवण्यासाठी असे वक्तव्य केले जात आहे. असा आरोप विवेक ओबेरॉयने यांनी केला होता.