३.७ कोटींचे घर केवळ २८० रुपयात ? फक्त ही एक 'अट'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 11:51 AM2022-11-06T11:51:23+5:302022-11-06T11:52:29+5:30
२८० रुपयांच्या लॉटरी तिकिटावर हे आलिशान घर मिळणार आहे. हे तीन मजली घर असून याची बाजारातील किंमत ३.७ कोटी रुपये आहे
सध्या लाख आणि कोटीमध्ये असलेल्या घरांच्या किंमती. घर घ्यायचं म्हणलं तर मोठी उडी मारण्यासारखेच आहे. अनेकांसाठी तर स्वत:चे घर घेणे म्हणजे स्वप्नच आहे. पण जर तुम्हाला फक्त २८० रुपयात घर मिळत असेल तर ? हे खरे आहे, ब्रिटनमध्ये राहणाऱ्या तीन भावांनी ही खास ऑफर दिली आहे. ते त्यांच्या घराची डील केवळ २८० रुपयात करणार आहेत.
यामागे खरी गोष्ट ही की, २८० रुपयांच्या लॉटरी तिकिटावर हे आलिशान घर मिळणार आहे. हे तीन मजली घर असून याची बाजारातील किंमत ३.७ कोटी रुपये आहे. ४ बेडरुम, एक मोठे स्वयंपाकघर, डायनिंग एरिया, लिव्हिंग रुम आणि एक मेंटेनंस यार्ड अशी घराची रचना आहे. विशेष म्हणजे घरात अत्याधुनिक फर्निचर आहे आणि हिवाळ्यात खास शेकोटीची सुविधा आहे. या घरावर तीन भावांनी लॉटरी काढली आहे.डॅनियल, जेसन आणि विल ट्विनफोर अशी त्यांची नावे आहेत.
हे आलिशान घर जर भाड्याने दिले तर दरमहा तब्बल १ लाख ८८ हजार रुपये भाडं मिळू शकतं. आता हे घर फक्त २८० रुपयात खरेदी करण्यासाठी ट्विनफोर भावांना एका अटीची पुर्तता करावी लागणार आहे. स्टॅंप ड्युटी आणि लीगल फीस भरण्यासाठी जवळपास १ लाख ५५ हजार लॉटरी तिकिटे विकणे बंधनकारक आहे. जर १ लाख ५५ हजार लॉटरी तिकिटे विकली गेली नाहीत तर जो विजेता असेल त्याला तिकिटाच्या एकूण रकमेची ७० टक्के फीस भरावी लागेल.
४ बेडरुमच्या या आलिशान घराची खासियत म्हणजे याचे लोकेशन. लंडनच्या चैथम ट्रेन स्टेशनपासून हे अगदी जवळ आहे. तर व्हिक्टोरिया आणि लंडन सेंट पैनक्रास येथून एक तासाच्या अंतरावर आहे. ट्वेनफोर भावांनी याआधी त्यांच्या इतर संपत्ती असाच प्रकारे लॉटरी काढून विकल्या आहेत.